Health Tips : ऑक्टोबर हिटपासून दूर राहण्यासाठी ताडगोळे बहुपयोगी!
ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे. ऑक्टोबर महिना म्हटला की हिट सुरु होते. या महिन्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंडगार फळं खावीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सीझनमध्ये बाजारत हमखास दिसणारं फळ म्हणजे ताडगोळे. थंडगार आणि चवीला अतिशय रसाळ लागणारे ताडगोळे अनेकांना आवडतात.
याच ताडगोळ्याचे अनेक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे फायदे आहेत. ताडगोळे खाल्ल्याने शरीरातील उष्णता तर कमी होतेच पण त्याचबरोबर अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
किडनीच्या आरोग्यासाठी ताडगोळे अतिशय उपयुक्त असून शरीरात नको असलेली द्रव्य ताडगोळ्याने दूर करता येतात.
ताडगोळ्यामुळे शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी होतो.
कांजण्या आलेल्या रुग्णांनी ताडगोळे खावेत. त्यामुळे कांजण्यांनी शरीराला येणारी खाज कमी होते.
ताडगोळ्यात पोटॅशियम, लोह, फॉस्फरस आणि व्हिटॅमि बी, सी आढळतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.