Brown Rice: जाणून घ्या ब्राऊन राइस खाण्याचे फायदे!
पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत आजकाल बाजारात ब्राऊन राइसची मागणी लक्षणीय वाढली आहे. लोकांनी दैनंदिन आहारातही याचा समावेश करायला सुरुवात केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हालाही या भाताचा आहारात समावेश करायचा असेल तर त्याचे फायदे नक्की जाणून घ्या.
या तांदळात जीवनसत्त्वे, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियमसारखे अनेक पोषक घटक असतात.
ब्राऊन राइसमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियमसारखे अनेक पोषक घटक असतात.
ब्राऊन राइसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनाने टाईप २ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
ब्राऊन राइसमध्ये भरपूर जीवनसत्त्वे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास देखील मदत करतो. मानसिक आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे.
ब्राऊन राइसमध्ये आढळणारे फायबर आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक देखील वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
मॅग्नेशियम समृद्ध ब्राऊन राइस हाडांच्या खनिज घनता वाढविण्यास मदत करू शकतात. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.