Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prajaktta Mali : फॅट टू फिट! ‘रान बाजार’साठी प्राजक्ता माळीने वाढवलेलं ‘इतकं’ वजन! पाहा फोटो...
'रानबाजार' (Raan baazaar) ही वेब सीरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सीरीजमधील भूमिकेमुळे सध्या या दोघींनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या वजनाची चर्चा सुरु आहे.
‘रान बाजार’ या सीरीजसाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्रचंड मेहनत घेतली आहे. या सीरीजमध्ये प्राजक्ताने ‘रत्ना’ नावाचे पात्र साकारले आहे. वारांगणा असलेली रत्ना साकारण्यासाठी प्राजक्ताने प्रचंड मेहनत घेतली आहे.
‘रत्ना’ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्राजक्ताने अभिनयापासून ते देहबोलीपर्यंत सगळ्याचाच बारकाईने अभ्यास केला. या भूमिकेसाठी तिला स्वतःचे वजन देखील वाढवावे लागले होते. प्राजक्ताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती दोन वेगवेगळ्या अवतारात दिसत आहे. एकीकडे तिने साकारलेली रत्ना आहे, तर दुसरीकडे खऱ्या आयुष्यातील प्राजक्ता.
‘रत्ना’ या भूमिकेसाठी आपण तब्बल 11 किलो वजन वाढवल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. रत्नाच्या भूमिकेसाठी प्राजक्ताने 61 किलो इतकं वजन वाढवलं होतं. आता चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ती परत एकदा आपल्या मूळ वजनात येण्यासाठी मेहनत घेत आहे. (Photo : @Prajakta Mali /IG)