Health Tips : स्वयंपाकातील काळीमिरी आरोग्यावर रामबाण उपाय

काळी मिरी (Black Pepper) आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. याचं सेवन करण्यासाठी विविध प्रकार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणारी काळी मिरी तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. स्वयंपाक घरात जेवणाची चव वाढवणारी काळी मिरी अतिशय उपयुक्त आहे.

भारतीय मसाल्यांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काळी मिरी. काळी मिरी हा औषधांचा खजिना आहे. परदेशातही काळी मिरीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काळी मिरीचे फायदे जाणून घ्या.
काळ्या मिरीच्या सेवनाने सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. काळी मिरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते.
काळी मिरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते. काळी मिरी कर्करोगाशी लढण्यास मदत करते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरीचं चघळून किंवा चोखून सेवन करा. यामुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होईल. काळी मिरीचं सेवन मासिक पाळी नियमित करण्यासही फायदेशीर आहे.
याशिवाय मधुमेह टाळण्यास देखील याचा फायदा होतो. काळी मिरीच्या सेवनाने श्वसनासंबंधित समस्याही दूर होतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.