Aurangabad Photo Story : बैठक शांतता समितीची,पण टोलेबाजी नेत्यांची; पहा कोण काय म्हणालं...
याच बैठकीत शहरातील राजकीय नेत्यांनी एकमेकांना खोचक टोले लगावत जोरदार बॅटिंग केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहराला आता पाच मंत्री एक विरोधी पक्षनेता मिळाला, त्यामुळे खड्ड्यांचे हे शेवटचे वर्ष असेल असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.
खैरे यांचे नाव सत्कारासाठी सर्वात आधी घेतल्याने आमदार संजय शिरसाट संतापले आणि कार्यक्रम सोडून निघाले. त्यांना जलील यांनी थांबवलं.
यापुढील खासदार आमचाच असेल असा टोला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी जलील यांना लगावला.
मी ज्युनिअर मंत्री आहे. दुसऱ्याच टर्ममध्ये आमदारकी भेटली. इतरांसारखे नाही. इतरांनाही भेटेलच, असा अप्रत्यक्ष टोला सावेंनी शिरसाट यांना लगावला.
तर चौकातील वाहतूक बंद केल्यावरून पोलिसांवर टीका करणाऱ्या नेत्यांना पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी उत्तर दिले. चौक बंद करण्यात मला रस नाही. नागरिकांचीच मागणी होती,असा टोला लगावला.