Ganesh Chaturthi 2022 : मोरगाव येथे आजपासून भाद्रपद यात्रेला सुरुवात; भक्तांची मांदियाळी

Ganesh Chaturthi 2022 : अष्टविनायकांपैकी प्रथम तीर्थक्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगाव येथे आजपासून भाद्रपद यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे.

Continues below advertisement

Ganesh Chaturthi 2022

Continues below advertisement
1/7
तमाम गणेशभक्तांचं आराध्यदैवत असलेल्या गणपतीचं (Ganesh Chaturthi 2022) आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. या निमित्ताने अष्टविनायकांपैकी प्रथम तीर्थक्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगाव येथे आजपासून भाद्रपद यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे.
2/7
भाद्रपद यात्रा उत्सव रविवार 28 ऑगस्टपासून (आज) ते 1 सप्टेंबर असा पाच दिवसांचा असतो. या निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना पाच दिवस श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जात असल्याने यात्रेसाठी राज्यभरातून लाखो गणेशभक्त मोरगाव येथे दाखल झाले आहेत.
3/7
वर्षभरातील भाद्रपद आणि माघ महिन्यात श्री. मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते. वर्षभरात साजरा केल्या जाणाऱ्या प्रमुख उत्सवांपैकी या पर्व काळाला फार महत्त्व दिले जाते. कारण या पाच दिवसात सर्व गणेशभक्तांना मुख्य मूर्तीला स्पर्श करून दर्शन करता येते. तसेच जलस्नान घालता येते. बारामतीतील मोरगाव येथे गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे.
4/7
भाद्रपद यात्रा उत्सवासाठी आज पहाटे चार वाजता मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यात आले. दैनंदिन पूजा विधी झाल्यानंतर मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी सर्वांना मार्ग खुला करण्यात आला. पहाटे 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जलस्नान निमित्त गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. तसेच दुपारी मानाचा पोशाख श्रींना परिधान केला जातो.
5/7
पहाटे 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जलस्नान निमित्त गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. तसेच दुपारी मानाचा पोशाख श्रींना परिधान केला जातो.
Continues below advertisement
6/7
कोरोना काळानंतर तब्ब्ल दोन वर्षांनी भारतासह जगभरात सण, समारंभ, उत्सव साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय. याचीच प्रचिती आज मोरेगावात भाद्रपद यात्रेनिमित्त पाहायला मिळाली.
7/7
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू आणि आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
Sponsored Links by Taboola