Health Tips : निरोगी शरीरासाठी वाचा बिटाचे आश्चर्यकारक फायदे; 'असा' करा वापर
बीट या कंदमुळात अनेक पौष्टीक गुणधर्म असतात. अनेकांना बीट खायला आवडत नाही परंतु याचे फायदे अनेक आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीटमध्ये रक्त वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदेशीर गुणधर्म असतात. तसेच बीटमध्ये आयर्न आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे तुम्हाला फायदा होतो.
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला बीटचा जास्तीत जास्त पोषक तत्व हवे असतील तर, तुम्ही रिकाम्या पोटी बीटचा ज्यूस पिऊ शकता. तसेच, तुम्ही या ज्यूसमध्ये लिंबाचा रस आणि थोडेसे काळे मीठ घालून देखील पिऊ शकता.
यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. यासोबतच अॅनिमियामध्येही याचे सेवन फायदेशीर ठरेल. त्यामुळे त्वचेच्या समस्याही दूर होतात.
बीट वापरण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही बीटापासून बनवलेला पराठा खाऊ शकता. यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळेल.
बीटाचे सेवन करण्याचा तिसरा आणि महत्वाचा मार्ग म्हणजे तुम्ही बीट सॅलडमध्ये देखील मिक्स करून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला अनेक जीवनसत्त्व मिळतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.