Photo : पुण्यात तुफान राडा, ठाकरे आणि शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या भिडल्या
पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रंचड राडा झालाय. दोन्ही गटाच्या महिला कार्यकर्त्या एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या.
Continues below advertisement
clash between uddhav thackeray and cm eknath shinde supporter in pune
Continues below advertisement
1/11
पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय.
2/11
ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
3/11
दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे बाचाबाची झाली.
4/11
पुण्यातील गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर हा प्रकार घडला आहे. हा सगळा राडा थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.
5/11
दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जात होते.
Continues below advertisement
6/11
दोन्ही गटाच्या महिला कार्यकर्त्या एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या.
7/11
पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला कार्यकर्त्या यावेळी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या.
8/11
शिंदे समर्थकांच्या घोषणाबाजीनंतर ठाकरे समर्थक आक्रमक झाले. त्यांच्याकडूनही घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
9/11
पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या मार्गावर थांबवलं. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढून त्यांना येथून जाण्यास सांगितलं आहे. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
10/11
पोलिसांनी मध्यस्थी केली. परंतु, दोन्ही बाजूचे कार्यर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांची देखील दमछाक झाली.
11/11
दोन्ही गटातील राड्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
Published at : 18 Feb 2023 05:02 PM (IST)