PHOTO : 'हा' आहे जगातील सर्वात धोकादायक डास; दरवर्षी लाखो लोकांना मारतो
तुम्हाला माहीत आहे का, जगात एक असा डास आहे ज्यावर कोणत्याही डासांपासून बचाव करणाऱ्या औषधांचा परिणाम होत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडासांच्या 2500 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, परंतु या सर्वांपैकी केवळ 100 प्रजाती चावतात.
डासांचे सरासरी जीवनचक्र तीन महिने असते. तर नर डास फक्त 10 दिवस जगतात. मरण्यापूर्वी, एक मादी डास सुमारे 500 अंडी घालते.
एडिस इजिप्ती हा जगातील सर्वात धोकादायक डास आहे.
एडिस इजिप्तीच्या चाव्यामुळे झिका, पिवळा ताप आणि डेंग्यू सारखे गंभीर आजार होतात.
या डासावर कोणत्याही अगरबत्ती, धूर किंवा फवारणीचा कोणताही परिणाम होत नाही.
एडिस अल्बोपिक्टस नावाचा हा डास दुसऱ्या क्रमांकाचा धोकादायक डास आहे.
पिवळा ताप, डेंग्यू एडिस अल्बोपिक्टसच्या चाव्याद्वारे पसरतात.
हा डास सर्वप्रथम दक्षिण-पूर्व आशियामध्ये जन्माला आला. पण आता तो जगातील सर्व गरम देशांमध्ये आढळतो.