Vegetables Benefits : हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहेत या भाज्या उपयुक्त जाणून घ्या आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा
हृदयविकाराच्या झटक्याची वाढती प्रकरणे ही चिंतेची बाब आहे. हा आकडा पाहता हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात ही स्थिती अधिक गंभीर असू शकते कारण हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या हंगामात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
जीवनशैलीव्यतिरिक्त आहाराचा हृदयाच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे हृदयासाठी फायदेशीर अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा.
पत्ता कोबी : पत्ता कोबीमध्ये अँथोसायनिन्स असतात, जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकार रोखण्यास मदत होते. अँटी-ऑक्सिडंट्स जळजळ होण्याचा धोका देखील कमी करतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय यात जीवनसत्त्व -के देखील आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
ब्रोकोली : ब्रोकोलीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रॅडिकल नुकसान आणि जळजळ कमी करतात. याशिवाय यामध्ये फायबर देखील आढळते, जे रक्तातील साखर नियंत्रित करते, ज्यामुळे धमनी खराब होण्याचा धोका कमी होतो आणि हार्ट अटॅक आणि हायपरटेन्शनचा धोकाही कमी होतो. त्यामुळे हृदयासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते.
केल : केल या भाजीमध्ये जीवनसत्त्व -सी, जीवनसत्त्व -के, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फोलेट असते, जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिडकोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकारांपासून बचाव होण्यास मदत होते. तसेच कॅन्सर पासून बचाव करण्यासही मदत होते.
फुलकोबी : हिवाळ्यात फुलकोबी भरपूर खाल्ली जाते, पण ती आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने आपल्याला जीवनसत्त्व -सी, फोलेट आणि फायबर मिळते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकते.
मुळा : मुळा देखील हिवाळ्यात भरपूर प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे. यात अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त असतात. हे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास देखील मदत करते.
टीप : हृदयासंबंधी आजार असल्यास या सर्व भाज्यांचे नियमित सेवन केल्याने हृदय निरोगी ठेवण्यास मदत होईल .