GK: 'या' फळांच्या बिया खाल्ल्यास होऊ शकतो मृत्यू; असं काय आहे त्यांच्या बियांमध्ये? पाहा...
सफरचंद हे एक अतिशय चांगलं फळ आहे जे त्याच्या चव आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. पण सफरचंदाच्या बियांमध्ये सायनाइड आढळतं. सायनाइड हा एक विषारी घटक आहे ज्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात जळजळ, मळमळ, जुलाबांसारखी अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सफरचंदाच्या बिया जास्त प्रमाणात खाल्ल्याने मृत्यूही होऊ शकतो. म्हणूनच सफरचंद खाताना बिया फेकून द्याव्यात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेर हे देखील एक स्वादिष्ट फळ आहे ज्यामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. पण पेरच्या बिया आरोग्यासाठी घातक असतात. यामध्ये सायनाइड देखील आढळतं, जे खाल्ल्यास पोटदुखी, मळमळ आणि जुलाब होऊ शकतात.
पीच फळ हे त्याच्या गोड चवीसाठी आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. पण त्याच्या बियांमध्ये अमिग्डालिन आणि सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स सारखे विषारी घटक आढळतात. या घटकांमुळे पीच फळाच्या बिया खाल्ल्याने पोटदुखी, अस्वस्थता आणि अशक्तपणा येऊ शकतो. आजारपणात या पीच फळाच्या बिया खाणारा व्यक्ती कोमा मध्ये देखील जाऊ शकतो.
चेरी फळ हे त्याच्या उत्कृष्ट चव आणि रंगासाठी प्रसिद्ध आहे. पण त्याच्या बिया आरोग्यासाठी घातक आहेत. चेरीच्या बियांमध्ये सायनाइड कंपाऊंड देखील असतं, जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटदुखी, अतिसार आणि मळमळ होऊ शकते. या बिया जास्त प्रमाणात खाल्ल्याने मृत्यूचा धोकाही असू शकतो.
फळं खाण्यापूर्वी त्यांच्या बिया काढून टाकणं आणि ते पूर्णपणे स्वच्छ करणं चांगलं असतं. फळांच्या बियांसंबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.