Foods For Oral Health : तुम्हावलाही निरोगी दात आणि हिरड्या हव्यायेतं का? मग 'या' 8 सुपरफूड्सचा तुमच्या आहारात मावेश करा

आपलं हास्य हे केवळ आपल्या चेहऱ्याचे सौंदर्यच वाढवत नाही तर आपला आत्मविश्वास देखील वाढविण्यास मदत करते. निरोगी राहण्यासाठी फक्त शारीरिक आणि मानसिकच नाही तर तोंडाचं आरोग्य देखील तितकंच निरोगी ठेवणं गरजेचं आहे.(Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दात आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी आपल्या आहारात योग्य बदल करणे आवश्यक आहे. तुम्हालाही तुमचे दात आणि हिरड्या मजबूत करायचे असतील तर या पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.(Photo Credit : pixabay)

मनुके : अँटीऑक्सिडंटने समृद्ध, मनुके हिरड्यांशी संबंधित आजार टाळण्यासाठी आणि निरोगी दातांसाठी फार उपयुक्त ठरतात. (Photo Credit : pixabay)
पालेभाज्या : हिवाळ्यात भरपूर हिरव्या पालेभाज्या मिळतात, ज्या अनेक समस्यांपासून वाचवतात. या फायबर-समृद्ध भाज्या तुमच्या तोंडाचा ताजेपणा टिकवून ठेवण्यास आणि नैसर्गिक टूथब्रशप्रमाणे काम करण्यास मदत करतात.(Photo Credit : pixabay)
ब्रोकोली : आजकाल ब्रोकोलीच्या फायद्यांमुळे बरेच लोक आपल्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करतात. यामुळे आरोग्याला तर फायदा मिळतोच पण दातही स्वच्छ होतात. (Photo Credit : pixabay)
सफरचंद : सफरचंद हे फळ अनेक गुणधर्मांनी समृद्ध असल्याने डॉक्टर देखील दररोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सफरचंदामुळे हिरड्या मजबूत होतात.(Photo Credit : pixabay)
मासे : माशांमध्ये असलेल्या ओमेगा-3 तेलामुळे पिरियडॉन्टायटीस किंवा हिरड्यांच्या आजाराचा धोका कमी होतो.(Photo Credit : pixabay)
पनीर : पनीर कॅल्शियमचाही चांगला स्रोत आहे. याशिवाय यामध्ये प्रथिनेही चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे तुमचे दात आणि हिरड्या मजबूत राहण्यास मदत होते.(Photo Credit : pixabay)
काजू : हिवाळ्यात काजू खाल्ल्याने अपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. एवढेच नाही तर ते तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. काजू खाल्ल्याने तोंडात जास्त लाळ निर्माण होते, ज्यामुळे दात स्वच्छ राहण्यास मदत होते.(Photo Credit : pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pixabay)