Tea-Tree Oil Benefits : टी-ट्री ऑईलचे हे फायदे माहित आहेत का?
टी ट्री ऑईल त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. यामुळे त्वचा आणि केसांना प्रचंड फायदा होतो. या तेलामुळे केस आणि त्वचेचे आरोग्य कसे सुधारते हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटी ट्री ऑईल त्वचेवरील डाग कमी करण्यासही मदत करते. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करतात, तर त्याचे अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संसर्ग टाळण्यास मदत करतात. चट्टे असतील तर त्यावर टी ट्री ऑईल लावल्यास कालांतराने ते कमी होण्यास मदत होते.
टी ट्री ऑईलमध्ये नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते अॅथलीट फू आणि टोनेल फंगस (पायाच्या नखांच्या बुरशी) सारख्या बुरशीजन्य संसर्गावर एक उत्तम उपाय ठरतं.
हे तेल बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करण्यास देखील मदत करु शकतं, ज्यामुळे ते अँटीफंगल क्रीम आणि औषधांसाठी एक उत्तम नैसर्गिक पर्याय ठरु शकतं.
टी ट्री ऑईल केवळ तुमच्या त्वचेसाठीच नाही तर केसांच्या निरोगी वाढीस देखील मदत करु शकतं. त्यात नैसर्गिक अँटीफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे, जे केसांची छिद्रे बंद करण्यास मदत करतात आणि केसांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देतात.
हे डोक्यातील कोंडा आणि ड्राय स्काल्पची समस्या कमी करण्यास देखील मदत करु शकतं, जे केस गळण्यास कारणीभूत ठरतं.
जर तुमची त्वचा फारच तेलकट असेल तर टी ट्री ऑईल तुमच्यासाठी गेम चेंजर ठरु शकतं. हे तेल त्वचेतील तेल निर्मिती नियंत्रित करण्यास मदत करतं. टी ट्री ऑईल तुमच्या चेहऱ्यावरुन अतिरिक्त तेल आणि घाण हटवून चेहरा स्वच्छ आणि रिफ्रेश करण्यास मदत करतं.
टी ट्री ऑयल आपल्या सूथिंग प्रॉपर्टीजसाठी ओळखलं जातं. सूजन आणि जळजळ कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
जर तुमच्या चेहऱ्यावर खाज किंवा जळजळ होत असेल किंवा तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर तुम्ही टी ट्री ऑइल लावून त्वचेची जळजळ कमी करु शकता.
टी ट्री ऑईल मुरुमांशी लढण्यास मदत करते. टी ट्री ऑइलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. जे जळजळ कमी करण्यास आणि मुरुमांना कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारण्यात मदत करतात. हे तेल छिद्रे बंद करण्यास आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास देखील मदत करते.