Poha Tikki Recipe : पावसाळ्यात घ्या गरमा गरम पोहा टिक्कीचा आनंद, जाणून घ्या रेसिपी
पावसाळ्यात काही चटपटीत खायला मिळालं तर अशा वातावरणाची मज्जा. तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहोत जी झटपट तयार होते आणि अतिशय चविष्ट असते. हा पदार्थ म्हणजे पोहा टिक्की. सहजपणे होणाऱ्या या पोहा टिक्कीची रेसिपी जाणून घेऊया...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोहा टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य : उकडलेले बटाटे, पोहे, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, काळीमिरी पावडर, मीठ, सैंधव, आलं-लसूण पेस्ट, जिरे पावडर, आमचूर पावडर, धणे पावडर, कोथिंबीर, कॉर्न फ्लॉर, तांदळाचं पीठ
पोह्याची टक्की बनवणं अतिशय सोपं आहे. यासाठी उकडलेले बटाटे चांगल्या पद्धतीने मॅश करुन घ्या. मग पोहे स्वच्छ धुवून, पाणी नितळून घ्या. हे पोहे मग बटाट्यासोबत एकजीव करुन घ्या.
आता या मिश्रणात कांदा, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, तांदळाचं पीठ, लाल तिखट, काळीमिरी पावडर, मीठ, सैंधव, जिरे पावडर, आमचूर पावडर, धणे पावडर, कोथिंबीर, कॉर्न फ्लॉर घालून मळून घ्या.
टिक्कीला कोट करण्यासाठी स्लरी बनवा. यासाठी कॉर्नफ्लॉरचा वापर करा. कॉर्न फ्लॉरमध्ये पाणी, मीठ आणि काळीमिरी घालून पातळ पेस्ट बनवा.
आता बटाटे आणि पोह्याच्या मिश्रणाचे छोट्या छोट्या टिक्की बनवा. या टिक्की कॉर्न फ्लॉरच्या पेस्टमध्ये बुडवा. त्यानंतर टिक्की कोरड्या पोह्यांमध्ये घोळवून घ्या.
सर्व टिक्की अशाच प्रकारे करुन घ्या आणि मग गरम तेला डीप फ्राय करा किंवा तव्यात शॅलो फ्राय करा. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. तयार आहे पोहा टिक्की. या टिक्की हिरव्या चटणीसोबत खा.
टिक्की शेकताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ती तुम्हा मंद आचेवरच शेकायची आहे. यामुळे टिक्की क्रिस्पी होते आणि अगदी आतपर्यंत शेकते.