PHOTO : सूर्यफुलाच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे; आरोग्यासाठी गुणकारी

सूर्यफुल हे दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असते. सूर्यप्रकाशानुसार ते दिशा बदलत राहते. हे फूल दिसायला जितके आकर्षक असते तितकेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सूर्यफुलाच्या बिया औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात, जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात. या बियांमध्ये प्रथिने, कॅल्शियम यांसारख्या घटकांचा समावेश असतो.

हृदयाशी संबंधित आजारांचा धोका आजकाल वाढला आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आढळते, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. या बियांचे नियमित सेवन केल्यास स्ट्रोकचा धोका टाळता येतो.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते. याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
या बियांमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ई आणि अनेक पोषक घटक असतात, जे हाडे निरोगी ठेवतात.
सूर्यफुलाच्या बिया मन शांत ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले मॅग्नेशियम मेंदूसाठी फायदेशीर आहे.
संधिवात समस्या असलेल्या लोकांसाठी सूर्यफुलाचे तेल खूप फायदेशीर मानले जाते. या तेलाचा वापर सांधेदुखीच्या समस्येत मदत करू शकतो.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.