Mango Barfi: आंब्याच्या लस्सीपेक्षाही स्वादिष्ट आंब्याची बर्फी; एकदा नक्की बनवून पाहा, लहान मुलांनाही आवडेल
तुम्ही उन्हाळ्यात मँगो मिल्कशेक, मँगो आइस्क्रीम, मँगो मूस, मँगो कस्टर्ड, मँगो लस्सी इ. ट्राय केलं असेल. पण तुम्ही कधी मँगो बर्फी ट्राय केली आहे का? ही बर्फी देखील खास आहे, कारण त्याची चव तुम्हाला रसाळ आंब्याची आठवण करून देईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही रेसिपी बनवण्यासाठी आंबा, दूध, साखर आणि नारळ पावडर किंवा नारळाचा किस मिक्सरमध्ये बारीक केलेला लागेल. जर तुम्हाला रोज वेगवेगळ्या रेसिपी वापरायच्या असतील तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. ही मिठाई तुम्ही घरच्या पार्टीमध्येही सर्व्ह करू शकता.
आंब्याची बर्फी बनवण्यासाठी 1 कप चिरलेला आंबा आणि 1/2 कप दूध घालून मिक्सरमध्ये बारीक करा. त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करुन घ्या. आंब्याची पेस्ट पॅनमध्ये काढून मध्यम आचेवर ठेवा. प्रमाणानुसार साखर घाला आणि पूर्णपणे विरघळेपर्यंत मिसळा.
आता नारळ पावडर घालून मिक्स करा. सुमारे 20 मिनिटं शिजवा आणि दर मिनिटाला ढवळत राहा, जेणेकरून ते तळाशी चिकटणार नाही. मिश्रण आकारात येईपर्यंत आणि पॅनच्या सर्व बाजू सोडेपर्यंत शिजवायचे आहे, आता हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
हे मिश्रण एका मोल्डमध्ये काढून घ्या आणि एक इंच जाडीत समांतर पसरवा. हे मिश्रण सुमारे 30-40 मिनिटं असंच राहू द्या, त्यानंतर ते घट्ट होईल.
घट्ट झाल्यावर, त्याचे सुरीने चौकोनी तुकडे करा. तुमची आंबा बर्फी आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.