Make Eyebrow thick: भुवया दाट करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय; सौंदर्य देखील वाढेल

Make Eyebrow thick: प्रत्येकाला वाटते की त्यांच्या भुवया दाट आणि सुंदर असाव्या. बारिक भुवया असणाऱ्या स्रिया आयब्रो पेन्सिलने भुवया दाट करतात. पण हेच नैसर्गिकरित्या भुवया दाट करायच्या असतील तर...

दाट भुवयांसाठी टिप्स

1/10
लॅव्हेंडर तेल केसांच्या वाढीस मदत करते. लॅव्हेंडर इसेन्शियल ऑईलचे काही थेंब 1-2 चमचे जोजोबा किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा आणि या मिश्रणाने भुवयांवर मसाज करा. रात्रभर तेल असेच ठेवा आणि सकाळी सौम्य फेसवॉशने चेहेरा धुवा. इसेन्शियल ऑईल्स कधीच थेट त्वचेवर लावू नये, त्याचा त्वचेला त्रास होऊ शकतो. ते कायम खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळूनच लावावे.
2/10
तिळाचे तेल: तिळाच्या तेलाचे काही थेंब हाताच्या बोटांवर घ्या आणि भुवयांवर मसाज करा. सकाळी चेहरा स्वच्छ धुवा. तिळाच्या तेलामुळे निरोगी केस मिळतात आणि केसांची वाढ चांगली होते. कारण त्यात आवश्यक पोषक घटक असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात.
3/10
कांद्याचा रस: छोट्या कांद्याचा रस काढून भुवयांना लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या, त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
4/10
पेट्रोलियम जेली: पेट्रोलियम जेली भुवयांवर लावा आणि मसाज करा. पेट्रोलियम जेली रात्रभर तशीच राहू द्या, सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. पेट्रोलियम जेली तुमच्या भुवयाखालील त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि तिचे पोषणही करते. त्याच्यामुळे भुवयांवरील केस तुटण्याची शक्यता कमी होते.
5/10
ग्रीन टी: एक कप ग्रीन टी तयार करा आणि थंड होऊ द्या. चहामध्ये कापसाचा गोळा बुडवा आणि भुवयांना लावा. पाण्याने धुण्यापूर्वी 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात.
6/10
कोरफड: कोरफडी मध्ये अ‍ॅलोनिन (Aloenin) नावाचे घटक असते, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते, यामुळे भुवया दाट होतात. कोरफडीचा गर बोटांवर घेऊन काही मिनिटे हलक्या हाताने भुवयांवर मसाज करा. कमीतकमी 30 मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा चिकट वाटत असल्यास धुवून टाका.
7/10
खोबरेल तेल: भुवयांच्या केसांची वाढ करण्यात खोबरेल तेल फायदेशीर आहे. खोबरेल तेल भुवयांच्या केसांना जलद वाढण्यास मदत करते. रात्री झोपताना कापसाचा बोळा खोबरेल तेलात बुडवून भुवयांना लावा. रात्रभर तसेच ठेवा व सकाळी चेहेरा फेसवॉशने स्वच्छ धुवा.
8/10
एरंडेल तेल: एरंडेल तेल तुमच्या भुवयांना लावून काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर असेच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ धुवा. एरंडेल तेल केसांच्या वाढीस मदत करते.
9/10
बदाम तेल: बदामाच्या तेलामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात जे केसांना पोषण देतात आणि केस मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे भुवयांवर केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळून ते दाट होण्यास मदत होते. रात्री झोपताना आपल्या बोटांच्या टोकांवर बदाम तेलाचे काही थेंब घ्या आणि भुवयांवर तेलाचा मसाज करा. रात्रभर ठेवा आणि सकाळी स्वच्छ धुवा.
10/10
ऑलिव्ह ऑइल: ऑलिव्ह ऑइलमधील घटक केसांच्या वाढीस मदत करतात, त्यामुळे तुमच्या भुवया दाट होण्यासही ते मदत करू शकते. तुमच्या बोटाच्या टोकावर एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा एक थेंब घ्या आणि त्याचा भुवयांवर मसाज करा. दोन तास तसेच ठेवा आणि फेसवॉश आणि पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. दिवसातून एकदा हा उपाय करा.
Sponsored Links by Taboola