Sugar Side Effects: साखरेच्या अतिसेवनामुळे शरीरावर होतात 'हे' दुष्परिणाम; गोड खाणाऱ्यांनो वेळीच सावध व्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2023 08:35 PM (IST)
1
साखर खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा होत नाही.तर जास्त गोड किंवा साखरेचे अतिसेवन केल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वजन वाढणे, मधुमेह, दात किडणे आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार बळावण्यास सुरुवात होते. निरोगी शरीर हवं असेल तर त्यासाठी आपण कमीत कमी साखरेचं सेवन करणं गरजेचं आहे.
3
जास्त साखर खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात.
4
साखरेचा रक्तदाबावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
5
चॉकलेट, मिठाई किंवा साखरेचे जास्त सेवन केल्याने वजन वाढते.
6
साखरेचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा मूडवर देखील परिणाम होतो. यामुळे सतत चिडचिड होते, मूड खराब होतो.
7
अशक्तपणा आणि चिडचिड यामुळे झोपेवरही परिणाम होतो. जास्त गोड खाल्ल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो.