Hairfall Remedies: पावसाळ्यात खुप केस गळतात? मग घरच्या घरी करा 'हे' 4 सोपे उपाय; लवकरच होईल केस गळतीपासून सुटका
केसांमधला चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून अनेकदा केस धुता, त्यामुळे केसांचा ओलावा निघून जातो आणि केस निर्जीव होऊन गळू लागतात. केस तुटण्याची इतर कारणं म्हणजे प्रदूषण, बाहेरचं खाणं आणि जास्त तणाव.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्हालाही पावसाळ्यात केस गळण्याची समस्या भेडसावत असेल तर तुम्ही 4 घरगुती उपाय करू शकता, ज्यामुळे तुम्ही केस गळणं कमी करू शकता.
केसगळतीसाठी तुम्ही कडुलिंबाची पानं देखील वापरू शकता. कारण ती केसांची मुळं मजबूत करण्यास आणि केस गळणं कमी करण्यास मदत करतात.
केसांचं गळणं थांबवण्यासाठी तुम्ही पालक वापरू शकता. त्यात व्हिटॅमिन बी, सी, ई, ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि लोह आढळते. लोह टाळूला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते आणि केस मजबूत करते.
खोबरेल तेल देखील केस गळणं थांबवू शकतं, कारण त्यात लॉरिक ऍसिडचे अस्तित्व आढळते. हे केसांच्या मुळांचे पोषण करते आणि त्यांना तुटण्यापासून वाचवते.
केस तुटणे आणि केस गळणं थांबवण्यासाठी मेथी देखील उपयुक्त ठरू शकते. यामध्ये निकोटिनिक ऍसिड आणि प्रोटीन आढळतात, ज्यामुळे केस गळणे थांबवण्यास मदत होते.