Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुधाच्या दरावरुन किसान सभा आक्रमक
दूध दराच्या (Milk Price) मुद्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुधाच्या दरात (Milk Price) मोठी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी देखील आक्रमक झाले आहे. किसान सभेनं (Kisan Sabha) देखील आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे.
दुधाला 34 रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या दूध दर समितीने शासन आदेश काढला होता. मात्र, हा शासन आदेश राज्यातील दूध संघ आणि दुध कंपन्यांनी धुडकवला आहे.
दुधाचे भाव हे 34 रुपयांवरुन 27 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या विरोधात राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी दूध संकलन केंद्रांवर आदेशाची होळी करून हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दूध उत्पादक शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
राज्यात सध्या दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दुधाचे दर हे 34 रुपयांवरुन 27 रुपयांवर आले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तसेच शासनाच्या आदेशाची राज्यभर होळी देखील करत आहेत.
ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तसेच शासनाच्या आदेशाची राज्यभर होळी देखील करत आहेत. आज राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर शासनाच्या 34 रुपये दर देण्याच्या आदेशाची होळी करण्यात आली.
राज्यात दुध संघ आणि कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.