Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Benefits Of Listening Music : तुम्ही म्युझिक ऐकण्याचे हे आश्चर्यकारक फायदे ऐकलेत का? जाणून घ्या काय आहेत फायदे
तणाव कमी होतो : संशोधनात असे आढळून आले आहे की संगीत ऐकल्याने बायोकेमिकल स्ट्रेस रिड्यूसर सुरू होऊन तणाव कमी होतो.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम : आसे म्हटले जाते की जेव्हा संगीत वाजवले जाते तेव्हा रक्त प्रवाह सुलभ होण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)
म्युझिक हृदय गती कमी करू शकते, रक्तदाब कमी करू शकते, कोर्टिसोल म्हणजे तणावाच्या हार्मोनची पातळी कमी करू शकते आणि रक्तातील सेरोटोनिन आणि एंडोर्फिनची पातळी वाढवू शकते.(Photo Credit : Pixabay)
संस्मरणीय क्षणांना उत्तेजित करते :अल्झायमर रोग किंवा स्मृतिभ्रंश यावर कोणताही इलाज नाही. परंतु संगीत थेरपीच्या मदतीने त्याची काही लक्षणे दूर केली जाऊ शकतात. म्युझिक थेरपी रुग्णाला आराम देऊ शकते आणि मूड सुधारू शकते.(Photo Credit : Pixabay)
मूड चांगला राहतो : गाणी ऐकल्याने तुमचा मूडही खूप चांगला होतो. गाणी ऐकून मेंदू डोपामाइन या हार्मोनचे उत्पादन वाढवू शकतो. (Photo Credit : Pixabay)
हे वाढलेले डोपामाइन चिंता आणि नैराश्याची भावना दूर करण्यास मदत करतात. यासोबतच तुमचे आवडते गाणे तुमचा मूड लाइट करण्यासही मदत करते.(Photo Credit : Pixabay)
कमी खाण्यास उपयुक्त : संगीत लोकांना कमी खाण्यास मदत करते. अहवालानुसार जेवताना सॉफ्ट गाणी वाजवणे आणि लाइट मंद करणे यामुळे लोकांना त्यांचे जेवण स्लो होण्यास मदत होते आणि परिणामी तुमचे जेवण कमी होते.(Photo Credit : Pixabay)
वेदना नियंत्रित करते : म्युझिक थेरपी तणावाची पातळी कमी करण्यासाठी आणि वेदनांचे सिग्नल मेंदूमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी उत्कृष्ट मानले जातात. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.(Photo Credit : Pixabay)
व्यायाम करताना स्टॅमिना वाढतो : एक्सरसाइज ट्रॅक ऐकल्याने शारीरिक कार्यक्षमता वाढू शकते आणि कठीण व्यायामादरम्यान तग धरण्याची क्षमता किंवा सहनशक्ती वाढू शकते.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)