Exfoliate The Skin : त्वचेच्या आरोग्यासाठी, त्वचा चमकवण्यासाठी करा 'हे' हर्बल उपाय!
हिवाळ्याचा ऋतू आपल्यासोबत कोरडी आणि फिकट त्वचा घेऊन येतो. याचे कारण हिवाळ्यातील कोरडी हवा असू शकते. खरं तर हवेतील ओलावा कमी झाल्यामुळे त्वचेचा ओलावाही कमी होऊ लागतो. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळे त्वचा अतिशय निस्तेज, कोरडी आणि मुरडलेली दिसते. याशिवाय मृत पेशींमुळे त्वचेची काळजी घेणारी उत्पादने चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेला एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे. एक्सफोलिएटिंगमुळे त्वचेवर जमा झालेल्या त्वचेच्या मृत पेशी दूर होतात आणि चेहरा चमकदार दिसतो. (Photo Credit : pexels )
त्वचेची काळजी घेण्यासाठीही ओटमील खूप फायदेशीर आहे. यात अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, जे त्वचेला त्रास न देता एक्सफोलिएट करण्यास मदत करतात. (Photo Credit : pexels )
यासोबतच दह्यामध्ये आढळणारे लॅक्टिक ॲसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्यास ही मदत करते. हा मास्क बनवण्यासाठी ओट्स बारीक करून पावडर बनवून त्यात दही मिसळून ही पेस्ट स्वच्छ केलेल्या चेहऱ्यावर ३०-६० सेकंद लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.(Photo Credit : pexels )
कॉफी एक चांगला एक्सफोलिएंट आहे. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा चमकदार होते. हा मास्क बनवण्यासाठी कॉफी बीन्स बारीक करून पावडर बनवून त्यात खोबरेल तेल, ब्राऊन शुगर घालून चेहऱ्यावर ३०-४० सेकंद मसाज करा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.(Photo Credit : pexels )
ब्राउन शुगर आणि एवोकॅडो ऑइल त्वचेला एक्सफोलिएट करण्यासोबतच मॉइश्चरायझ देखील करतात, जे हिवाळ्यात त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हा मास्क बनवण्यासाठी ब्राऊन शुगरमध्ये एवोकॅडो तेल मिसळून चेहऱ्यावर ३० सेकंद मसाज करा आणि पाण्याने धुवा.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )