Corn Benefits : मका खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे!
कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्चचा उत्कृष्ट स्रोत असल्याने, मका तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमका विशेषतः हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे. पोषक तत्वांनी युक्त मक्याचे सेवन चांगले असते. [Photo Credit : Pexel.com]
भाजलेल्या मका सर्वांनाच आकर्षित करत असतात आणि त्या स्वादिष्ट लागते,याशिवाय मक्याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. [Photo Credit : Pexel.com]
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, सोडियम, फायबर हे घटक कॉर्नमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरतात. मकेमध्ये भरपूर पोषक असतात. कॉर्नचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया मक्याचे फायदे काय आहेत. [Photo Credit : Pexel.com]
मका पासून होणारे फायदे :वजन वाढल्याने अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मक्याचे सेवन वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण मकामध्ये फायबर आढळते, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]
शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. पण मक्याचे सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो. कारण मक्यामध्ये भरपूर लोह असते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. [Photo Credit : Pexel.com]
पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मक्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते. मक्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे त्याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि पचनाच्या समस्या दूर होतात. [Photo Credit : Pexel.com]
शरीरातील कोलेस्टेरॉल वाढणे अत्यंत घातक ठरते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मक्याचे सेवन कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरते. [Photo Credit : Pexel.com]
मक्याचे सेवन हाडे निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. कारण मक्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]