Skin Care Tips : तुम्ही कधी ऐकले का Red Wine मुळे चेहऱ्यावर ग्लो येतो? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
आजकाल रेड वाईन (Red Wine) पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. याचं कारण म्हणजे अनेकदा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून, मित्र-मंडळींकडून ऐकले आसेल की रेड वाईन प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर आरोग्य तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे पिंपल्स आणि डागांची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय हे बॅक्टेरिया कमी करण्यासही मदत करते.(Photo Credit : pixabay)
काही लोक असेही म्हणतात की, यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होण्यास मदत होते. वाईनच्या तुलनेत त्यात अल्कोहोल कमी प्रमाणात असते. रेड वाईन त्वचेसाठी खरंच फायदेशीर ठरू शकते का? यावर आरोग्य तज्ज्ञांचं नेमकं मत काय आहे ते जाणून घेऊयात. (Photo Credit : pixabay)
दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील त्वचाविज्ञान विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. डी.एम. महाजन सांगतात की, यामध्ये रेझवेराट्रोल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. (Photo Credit : pixabay)
हे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करतात. या अँटीऑक्सिडंटच्या दाहक-विरोधी गुणधर्मामुळे त्वचेमध्ये कोलेजन तयार होते, ज्यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होते.(Photo Credit : pixabay)
याबरोबरच कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाण चांगले नसते, असेही आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. रेड वाईन निःसंशयपणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. पण, रेड वाईन जास्त प्रमाणात प्यायल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. (Photo Credit : pixabay)
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि जळजळ होऊ शकते.(Photo Credit : pixabay)
रेड वाईन पिण्याबरोबरच याचा चेहऱ्यासाठी देखील तुम्ही वापर करू शकता. खरंत रेड वाईनने तुम्ही चेहरा स्वच्छ करू शकता. (Photo Credit : pixabay)
जर तुम्हाला पिंपल्स किंवा मुरुमांची समस्या वारंवार भेडसावत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी कॉटन बॉल रेड वाईनमध्ये बुडवून मुरुमांवर लावा. (Photo Credit : pixabay)
रेड वाईन त्वचेवर 15-20 मिनिटं सोडा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. पण, जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लोहवा असेल किंवा त्वचेच्या संबंधित समस्या टाळायच्या असतील तर रेड वाईनचा वापर करण्याआधी नक्कीच त्वचा रोग तज्ज्ञांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या. (Photo Credit : pixabay)