Red Banana : पिवळ्या आणि हिरव्या केळ्यांपेक्षा 'लाल केळी' आरोग्यासाठी जास्त फायदेशीर
आतापर्यंत आपण पिवळी आणि हिरवी केळी पाहिली असतील, पण बाजारात लाल रंगाचीही केळी उपलब्ध आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिवळ्या केळांपेक्षा लाल केळांमध्ये जास्त पोषक तत्वे आढळतात. यामुळेच त्यांचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजार टाळता येतात.
लाल रंगाच्या केळीची साल लाल रंगाची असते. तर त्याचा लगदा पिवळ्या केळ्यासारखा असतो. त्याचे सर्वाधिक उत्पादन दक्षिण-पूर्व आशियामध्ये होते. पिवळ्या केळाप्रमाणे लाल केळीही चवीला गोड असतात.
लाल केळी मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी मानली जातात. याचे दररोज मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
लाल केळांमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. जे रक्तदाब कमी करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवायचा असेल तर लाल केळी खावी.
लाल केळी डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही गुणकारी मानली जातात. लाल केळांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते.