Priyanka Chopra : तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारी प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्राची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
आता प्रियांका लवकरच एका बॉलिवूड सिनेमात झळकू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
प्रियांकाने 2002 साली 'थमिजहन' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.
प्रियांकाने 2003 साली 'अंदाज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
'ऐतराज', 'मुझसे शादी करोगी', 'फॅशन', 'डॉन', 'बर्फी', 'बाजीराव मस्तानी', 'मेरी कॉम', 'द व्हाइट टायगर' अशा अनेक बॉलिवूड सिनेमांचा प्रियांका चोप्रा भाग आहे.
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रियांकाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
प्रियांकाने 'द व्हाइट टायगर', 'बेवाच','अ किड लाइक जेक' अशा अनेक हॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे.
प्रियांकाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
प्रियांका चोप्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.