Kitchen Tips: पावसाळ्यात मीठ आणि साखेरला पाणी सुटतंय? तर हे टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
मीठ आणि साखरेच्या डब्यात थोडे तांदळाचे दाणे टाका. किंवा एखाद्या कापडात मूठभर तांदूळ भरुन ते मीठ आणि साखरेच्या बरणीत ठेवा, तयार झालेला ओलावा तांदूळ शोषून घेईल आणि साखर किंवा मिठाला पाणी सुटणार नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाखरेत आणि मिठात लाकडाची टुथपिक ठेवा, यामुळे साखरेतील आणि मिठातील ओलावा निघून जाईल.
मीठ आणि साखर काचेच्या बरणीत भरून ठेवा. कारण प्लास्टिक किंवा स्टीलचे डबे वापरल्याने बाहेरील उबदार वातावरणामुळे ओलसरपणा येतो. मात्र काचेच्या बरणीला ओलसरपणा कमी येतो आणि त्यामुळे मीठ आणि साखर कोरडी राहील.
बरणीच्या झाकणाला टिश्यू पेपर लावा. वातावरणातील ओलावा सर्वात आधी टिश्यू पेपर शोषून घेईल. त्यामुळे दमटपणा कमी होईल आणि मीठ किंवा साखर खराब होणार नाही. टिश्यू पेपर ओला झाल्यास तो लगेच बदलावा.
मीठ आणि साखर काढण्यासाठी कोरडा चमचा वापरावा. चुकूनही जर चमचा ओला किंवा दमट असेल तर त्यामुळे पूर्ण बरणीतील मीठ आणि साखर खराब होऊ शकते.
साखरेच्या डब्यात 6-7 लवंग आणि 6-7 राजमा घालून तुम्ही ठेवू शकतो, यामुळे साखर ओली होणार नाही आणि बराच काळ टिकेल.
साखर किंवा मीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपर वापरता येतो. यासाठी बरणीमध्ये साखर भरताना तळाला आधी ब्लोटिंग पेपर ठेवा. त्यानंतर त्यावर साखर किंवा मीठ भरून ठेवावं. ब्लोटिंग पेपर त्यामधील एक्स्ट्रा मॉश्चर खेचून घेतं.