मोहोळमध्ये झाडावर लगडलेले डाळींब चोरले
झाडावर लगडलेले डाळींब चोरल्यानं जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मोहोळ (Mohol) तालुक्यातील पोखरापूर इथं ही घटना घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार या शेतकऱ्याच्या शेतात ही चोरीची घटना घडलीय.
मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार यांनी स्वतःच्या शेतात अर्धा एकर डाळिंब आणि शेजारी असलेले दोन एकर शेत बटईने घेऊन त्यात डाळिंबाचे पीक घेतले होते.
पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार या शेतकऱ्याच्या शेतात ही चोरीची घटना घडलीय.
मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार यांनी स्वतःच्या शेतात अर्धा एकर डाळिंब आणि शेजारी असलेले दोन एकर शेत बटईने घेऊन त्यात डाळिंबाचे पीक घेतले होते.
दोन एकर बागेतील डाळिंब काढणीला आली होती. मात्र, नऊ जुलैला रात्री अमृत पवार यांनी शेतातील डाळिंबाला पाणी दिले. पहाटे जेव्हा ते बागेत गेले तेव्हा डाळिंबाच्या झाडांना फळे दिसली नाहीत.
भगव्या जातीचे तीन ते चार टन वजनाची सुमारे 2 ते अडीच लाख रुपये किमतीची डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले.
शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या संदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा नोंद करण्यात आली आहे
सध्या डाळिंब काढणीला आले होते. अतिशय काबाड कष्ट करुन आम्ही हे पिकं पिकवलं होतं. साधरणत: चाट टन डाळिंबाचा माल होता. तो चोरुन नेला आहे.