Pumpkin Seeds Health Benefits : भोपळ्याच्या बिया खाण्याचे अनेक फायदे!
डायबेटीस, हृदयविकार, कॅन्सरसारखे गंभीर आजार टाळण्यासाठी आहारात फळं, भाजीपाल्याचा समावेश करावा कारण प्रत्येक भाजीत भरपूर पोषणमूल्यं असतात. (Photo Credit : Pexel. com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही भाज्यांची सालं आणि बियादेखील आरोग्यासाठी उत्तम असतात.भोपळा हा त्यापैकीच एक आहे.भोपळ्याची भाजी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असते. तसंच भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी चांगल्या असतात. (Photo Credit : Pexel. com)
या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवता येतात. डायबेटीस, पोटाशी संबंधित त्रास असेल तर भोपळ्याच्या बिया खाणे फायदेशीर ठरू शकते. (Photo Credit : Pexel. com)
भोपळ्याच्या बिया पौष्टिक असतात. या बियांमध्ये झिंक, आरोग्यदायी फॅट्स आणि मॅग्नेशियम असतं. या बियांचं सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते. तसंच या बियांचा वापर सॅलड, स्मूदी, सूप आणि पास्तासारख्या अनेक पदार्थांमध्ये केल्या जातो. (Photo Credit : Pexel. com)
या बियांचे सेवन केल्याने मधुमेह, हृदयरोग, हाडे दुखणे, केस गळणे आणि मुरुमांवर नियंत्रण मिळवता येते. (Photo Credit : Pexel. com)
भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडेंट, दाहक-विरोधी, अँटीमाइक्रोबायल, संधिवात-विरोधी आणि मधुमेह-विरोधी गुणधर्म असतात. (Photo Credit : Pexel. com)
भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश केल्यास कोलेस्टेरॉल जमा होणे आणि रक्तवाहिन्या कडक होणे टाळता येते. (Photo Credit : Pexel. com)