Health Benefits : या 'सात' औषधी वनस्पतींची लागवड घरीच करा, मिळतील असंख्य फायदे!
आयुर्वेदात काही औषधी वनस्पती आहेत ज्या आरोग्याच्या बऱ्याच समस्यांवर प्रभावीपणे उपचार करू शकतात . या वनस्पती बऱ्याच काळापासून भारतीय परंपरेचा भाग आहेत आणि प्राचीन काळापासून विविध औषधी बनवण्यासाठी वापरल्या जात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहळद, आले, तुळशीची पाने, पुदिना आणि दालचिनी यासारख्या औषधी वनस्पती सामान्यत: भारतीय पाककृतींमध्ये वापरल्या जातात आणि ते आरोग्यासाठीही बरेच फायदे देतात.
कोरफड : आयुर्वेदात कोरफड ही औषधी वनस्पतींचा राजा' म्हणून ओळखले जाते. कारण ही वनस्पती विविध आरोग्याच्या समस्यांवर उपचार करू शकते. यात बद्धकोष्ठता,पचनाचा त्रास,मुरुम, शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होणे इत्यादी आजारांचा समावेश आहे
तुळस : तुळस ही वनस्पती आपल्या घरात असणे आवश्यक आहे. हिंदू धर्मात या वनस्पतीला खूप महत्त्व आहे. याचे धार्मिक महत्त्व तर आहेच, त्याचबरोबर आरोग्यासाठीही बरेच फायदे आहेत. तुळशीचा तीव्र सुगंध जीवाणूंची वाढ थांबविण्यासाठी पुरेसा आहे. हे आपल्याला तणावाशी लढण्याची शक्ती देते ,दीर्घायुष्य वाढवते, खोकल्यावर उपचार करते, अपचनावरही उपचार करते, तसेच केस गळणे, हृदयरोग या समस्याही दूर करते.
पुदिना: या ताज्या सुगंधी औषधी वनस्पतीचा अनेक प्रकारे वापर केला जातो. अपचनावर पुदिना हा रामबाण उपचार आहे. पुदिन्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कीटकांना दूर करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे त्यामुळे आपल्या घरात स्वच्छ वातावरण राहण्यास मदत होते. त्याचबरोबर पुदिना पचनसंस्था निरोगी ठेवते,रोगप्रतिकारशक्ती वाढवते,खोकला शरीरातून काढून टाकते.
मेथी : मेथी ही औषधी वनस्पतींपैकी एक आहे, ही वनस्पती तिच्या गुणधर्मांमुळे प्रसिद्ध आहे. ही सदाहरित वनस्पती असून त्याची पाने व बिया दोन्ही उपयुक्त आहेत. मेथी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते, केसगळती कमी करते,भूक वाढवते, आपली उत्सर्जन प्रणाली वाढवते, मेथीच्या सेवणाने रक्त शुद्ध होते, रक्तदाब कमी होतो तसेच वेदना आणि मधुमेहासाठीही मेथी फायदेशीर आहे.
बडीशेप:बडीशेप ही एक सुगंधी वनस्पती आहे, जी आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपयुक्त आहे. भारतात लोकांना जेवणानंतर बडीशेप चघळण्याची सवय आहे. ही वनस्पती खोकल्यावर उपचार करते, कोलेस्ट्रॉलही नियंत्रित करते, दृष्टी सुधारते, श्वासाची दुर्गंधी रोखते आणि या वानस्पतीच्या सेवणाने स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये आईच्या दुधाचा पुरवठा सुधारतो
कोथिंबीर:कोथिंबीर हा भारतीय स्वयंपाकघराचा महत्त्वाचा भाग आहे. याची पाने, बियाणे आणि बियाण्याचे चूर्ण हे सर्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या अन्नात एक विशिष्ट चव वाढवते आणि त्यात विविध औषधी गुणधर्म देखील असतात. कोथिंबीर अन्न खराब होण्यापासून रोखते, ही वनस्पती अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे त्यामुळे मूत्रधारणा बरे करते, पचनक्रिया सुधारते तसेच ही वनस्पती महिलांच्या मासिक पाळीचे नियमनही करते.
आले :कुठल्याही समस्येचं नाव सांगा, उपाय असेल आलं! आरोग्याच्या विविध समस्यांवर हा मूलभूत उपाय आहे. त्याच्या विशिष्ट चवीमुळे आणि अर्थातच आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी त्याच्या फायद्यांमुळे हा भारतीय अन्नाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आले अपचनावर उपचार करते त्याचबरोबर डोकेदुखी आणि रक्तदाबही नियंत्रित करते.