Control High Blood Pressure : उच्च रक्तदाब रोखण्यासाठी काही टीप्स...

हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब याला अनेकदा सायलेंट किलर म्हणतात . जेव्हा रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढतो तेव्हा असे होते . कोणत्याही लक्षणांशिवाय तुम्हाला वर्षानुवर्षे उच्च रक्तदाब असू शकतो . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भविष्यात तुम्हाला हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक इत्यादींसह अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली पाळणे गरजेचे आहे . [Photo Credit : Pexel.com]

सकस आहार आणि निरोगी जीवनशैली उच्चरक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते . येथे काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला निरोगी जीवनशैली जगण्यास मदत करू शकतात . [Photo Credit : Pexel.com]
वजन मर्यादित ठेवणे : जास्त वजनामुळे तुमचा रक्तदाबही वाढू शकतो , त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन संतुलित राखणे अत्यंत आवश्यक आहे . [Photo Credit : Pexel.com]
वजन व्यवस्थापनाकडे लक्ष द्या. तुमचे अतिरिक्त वजन कमी करा . यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा आणि व्यायामाकडे लक्ष द्या.उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन संतुलित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे . [Photo Credit : Pexel.com]
नियमित व्यायाम : नियमित व्यायाम आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो . व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेक आजारही दूर होतात . [Photo Credit : Pexel.com]
धूम्रपान करू नका : धूम्रपानाच्या सवयीमुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो . त्यामुळे ही सवय सोडून द्या. धूम्रपानामध्ये असलेले निकोटीन रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरू शकते . [Photo Credit : Pexel.com]
धुम्रपानामुळे हृदयविकार , कर्करोग आणि फुफ्फुसाचे आजार इत्यादी अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात . जे लोक रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनी धूम्रपानाची सवय सोडणे खूप महत्वाचे आहे . [Photo Credit : Pexel.com]
तणाव : तणाव हे देखील उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण असू शकते . त्यामुळे तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा . तणावामुळे शरीरात अस्वस्थता येते आणि हृदयाच्या कार्यावरही परिणाम होतो , त्यामुळे रक्तदाबही वाढू शकतो . [Photo Credit : Pexel.com]
योग आणि ध्यानाची मदत घ्या, ते तणाव कमी करण्यास मदत करतात. याशिवाय 8 तासांची चांगली झोप आणि शरीरासाठी विश्रांतीही महत्त्वाची आहे . [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे . यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत . [Photo Credit : Pexel.com]