New Year 2024 : नवीन वर्ष 1 जानेवारीलाच का सुरु होतं, यामागचं कारण माहितीय?
नववर्षाचं स्वागताआधी फक्त काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सध्या सर्वांची जोरदार तयारी सुरु आहे. (PC : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि न्यू इयर पार्टीसाठी अनेकांचे प्लॅन ठरले आहेत, तर काही जण नव्याने प्लॅन बनवत आहेत. (PC : istock)
2023 हे वर्ष संपणार असल्याने नवीन वर्षाची तयारी जोरात सुरू आहे, पण तुम्हाला माहीत आहे का नवीन वर्ष फक्त 1 जानेवारीलाच का साजरे केलं जातं. (PC : istock)
नवीन वर्ष साजरं करण्याची पद्धत पहिल्यांदा 45 ईसापूर्व सुरू झाली. पूर्वी रोमन कॅलेंडर मार्च महिन्यापासून सुरू होत असे आणि एका वर्षात 355 दिवस होते. (PC : istock)
रोमन हुकूमशाह ज्युलियस सीझरने हे कॅलेंडर बदललं आणि वर्षाचा पहिला दिवस बदलला. (PC : istock)
ज्युलियस सीझरने 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस घोषित केला. युरोपातील अनेक राज्यांनी 16 व्या शतकाच्या मध्यापर्यंत 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस असल्याचं स्वीकारलं नव्हतं पण ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतर लोकांचे विचार बदलले. (PC : istock)
25 डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर, 1 जानेवारी हे नवीन वर्ष म्हणून साजरे केलं जाऊ लागलं. (PC : istock)
त्यानंतर पोप ग्रेगरीने ज्युलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा करत आणि जानेवारीचा पहिला दिवस नवीन वर्ष म्हणून घोषित केला तेव्हापासून 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस असल्याचं अधिक रुढ झालं. (PC : istock)
काहींच्या मते, 4000 वर्षांपूर्वी, प्राचीन बॅबिलोनियन संस्कृतीच्या काळात नवीन वर्ष 11 दिवस साजरे केलं जायचं. नवीन वर्ष साजरा करण्याचा उत्सव 11 दिवस चालायला आणि या उत्सवाला अकिटू असं म्हटलं जायचं. या 11 दिवसांमध्ये दररोज नवीन विधी आणि प्रथा होत्या. (PC : istock)
कोणतेही कॅलेंडर हे सूर्यचक्र किंवा चंद्र चक्राच्या गणनेवर आधारित असतं. ग्रेगोरियन कॅलेंडर सूर्यचक्रावर आधारित आहे (PC : istock)
ग्रेगोरियन कॅलेंडर बहुतेक देशांमध्ये वापरलं जातं. त्यामुळे सर्वत्र 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. (PC : istock)