PHOTO : हिवाळ्यात तुमच्या आहारात 'या' गोष्टींचा नक्की समावेश करा
हिवाळ्यात 5 सुपरफूड्सचा समावेश करणे आवश्यक आहे, शरीरात उष्णता राहील, रोग कधीच होणार नाहीत. चला अशाच 5 सुपर फूड्सबद्दल जाणून घेऊयात ज्यांचा आपण हिवाळ्यात शरीराला उबदार आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो. [Photo credit : pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजसजसा हिवाळा जवळ येतो तसतसे आपल्या खाण्याच्या सवयीही बदलतात. या दिवसात आहारात काही गोष्टींचा समावेश करतो ज्यामुळे शरीर उबदार राहते आणि सर्दी आणि आजारांपासून आपले संरक्षण होते.[Photo credit : pexel.com]
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीराला उबदार ठेवणाऱ्या गोष्टी खा. तुम्ही तुमच्या आजींना हिवाळ्यात गूळ आणि तीळ खाण्यास सांगताना ऐकले असेल. या दोन्ही गोष्टी थंडीपासून आराम देतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात तुमच्या आहारात या 5 गोष्टींचा अवश्य समावेश करा. [Photo credit : theflavorbellls. com ]
खारीक : हिवाळ्यात खारीक खाणे खूप फायदेशीर आहे. खारीकमध्ये व्हिटॅमिन ए आणि बी चांगल्या प्रमाणात आढळते. खारीक उष्ण असते. ज्यामुळे थंडीत आराम मिळतो. हे आपले शरीर आतून उबदार ठेवते. त्यात फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर देखील पुरेशा प्रमाणात आढळतात. ज्यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. [Photo credit : pexel.com]
बदाम : हिवाळ्यात बदाम खाणे खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये प्रथिने, निरोगी चरबी, विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे सर्व घटक थंडीच्या दिवसात शरीराला उबदारपणा देतात आणि रोगांशी लढण्यास मदत करतात. [Photo credit : pexel.com]
तीळ हिवाळ्यात तीळ खाणे खूप फायदेशीर आहे. तिळाचे गुणधर्म नैसर्गिकरित्या उष्ण असतात. त्यामुळे हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत होते. तिळामध्ये चरबी आणि प्रथिने आढळतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. हाडांसाठीही फायदेशीर आहे. तीळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी-खोकला यांसारख्या सामान्य आजारांशी लढण्याची ताकद मिळते. [Photo credit : pexel.com]
गूळ : हिवाळ्यात गूळाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. गूळ पोटासाठी आणि संपूर्ण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने आपली चयापचय क्रिया चांगली राहते. हे पचनासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये लोह आढळून येते ज्यामुळे अॅनिमिया सारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच हिवाळ्याच्या थंडीत गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. [Photo credit : Healthifyme. com]
भुईमूग/ शेंगदाणे : हिवाळ्यात शेंगदाणे खाणे खूप फायदेशीर आहे. शेंगदाण्यामध्ये चरबी आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात ज्यामुळे ऊर्जा मिळते आणि शरीर उबदार राहते. याशिवाय व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर खनिजे देखील शेंगदाण्यात आढळतात जे सर्दीशी लढण्यास मदत करतात. शेंगदाणे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून आपले संरक्षण होते. त्यामुळे हिवाळ्यात शेंगदाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. [Photo credit : pexel.com]