Benefits of Retro Walking :आरोग्यासाठी ' रेट्रो 'चालण्याचे होतात हे फायदे !
तुम्हाला तंदुरुस्त आणि सक्रिय राहायचे असेल तर रेट्रो चालणे हा एक उत्तम पर्याय आहे. सर्व प्रथम, रेट्रो चालणे तुमचे पाय आणि पाठीचे स्नायू मजबूत करते. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेट्रो चालणे म्हणजेच सोप्या शब्दात उलटे चालणे किंवा मागच्या बाजूने चलणे. लहानपणी आपण खेळताना अनेकदा मागे न पाहता मागच्या बाजूला चालतो. मात्र याची तुम्हाला नंतर मदत होते. [Photo Credit : Pexel.com]
व्यायामत तुम्ही या चालण्याचा समावेश करू शकता. आज जाणून घेऊया रेट्रो चालण्याचे आरोगयास होणारे फायदे काय आहेत. [Photo Credit : Pexel.com]
तुम्ही जेव्हा मागच्या बाजूने चालता तेव्हा हे स्नायू वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि त्यामुळे ते मजबूत होतात. स्नायूंचा हा विकास तुमचे संतुलन आणि तग धरण्याची क्षमता सुधारतो.[Photo Credit : Pexel.com]
मजबूत क्वाड्रिसेप्स पायांना चांगला आधार देतात आणि दुखापती टाळतात. त्यामुळे रेट्रो चालणे शरीराच्या खालच्या वर्कआउटसाठी खूप फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]
जेव्हा आपण मागच्या बाजूने चालतो तेव्हा आपल्या शरीराला असामान्य क्रियाकलापांसाठी अधिक ऊर्जा लागते. [Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि फुफ्फुसांना अधिक ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होतो. हे सर्व मिळून आपली हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली मजबूत करते. [Photo Credit : Pexel.com]
रेट्रो चालणे हाडे आणि सांधे मजबूत करते, तुमचा सांगाडा अधिक स्थिर बनवते आणि दुखापतीचा धोका कमी करते. [Photo Credit : Pexel.com]
जेव्हा आपण मागील बाजूने चालतो तेव्हा आपल्या पायांवर आणि गुडघ्यांवर सामान्य चालण्याच्या तुलनेत कमी दाब असतो. [Photo Credit : Pexel.com]
यामुळे ज्या लोकांना गुडघेदुखी किंवा ऑस्टियोआर्थरायटिस सारख्या समस्या आहेत त्यांना गुडघ्याच्या सांध्यावर आणि गुडघ्यांवर कमी दाब पडतो. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]