Manoj Jarange : 'मनोज जरांगे' यांची पाऊले 5 महिन्यांनी घराकडे....

Manoj Jarange : मनोज जरांगे आज घरी परतणार...

मनोज जरांगे आज घरी परतणार...(Photo Credit : PTI)

1/9
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेली 5 महिने सतत आंदोलन करणारे मनोज जरांगे आज घरी परतणार आहेत. (Photo Credit : PTI)
2/9
आरक्षणाच्या मुद्द्यावर 29 ऑगस्टपासून तीन वेळा उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे आज आपल्या घराचा उंबरठा ओलांडत आत प्रवेश करतील. (Photo Credit : PTI)
3/9
जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण घरी जाणार नसल्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला होता, त्यामुळे तब्बल 5 महिने 3 दिवसांनंतर आज जरांगे आपल्या घरी परतणार आहे. (Photo Credit : PTI)
4/9
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरु केले होते. (Photo Credit : PTI)
5/9
आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका घेत जरांगे यांनी पुन्हा आंतरवालीत उपोषण सुरु केले. (Photo Credit : PTI)
6/9
विशेष म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण आता घरी जाणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली होती. (Photo Credit : PTI)
7/9
आता मुंबई आंदोलनावेळी सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला आहे, त्यामुळे आज मनोज जरांगे आपल्या घरी जाणार आहेत. (Photo Credit : PTI)
8/9
सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. (Photo Credit : PTI)
9/9
मात्र, अध्यादेश काढल्यावर सरकारमधील मंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात असल्याने आम्हाला शंका येत आहे. त्यामुळे सरकराने काढलेल्या अध्यादेशानंतर 9 फेब्रुवारीपर्यंत त्यांना वेळ देण्यात येत असून, त्यांनी या काळात अध्यादेश लागू करावे. अन्यथा मी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. (Photo Credit : PTI)
Sponsored Links by Taboola