Health Tips : वाढता लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉलमुळे तुम्हीही चिंतेत आहात का ? खास घरगुती उपाय करा !
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खानपानाच्या सवयीमध्ये अनेक बदल झाल्याने बरेच लोक लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉलच्या समस्येमुळे चिंतेत असतात. मात्र त्यावर आवळा हा एक चांगला उपाय ठरू शकतो . (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआवळ्याचा समावेश सुपरफूडच्या श्रेणीत केला जातो, कारण त्यात आरोग्यासाठी अनेक आवश्यक पोषक घटक असतात आणि केवळ आरोग्यासाठीच नाही तर आवळा खाल्ल्याने त्वचा आणि केसांशी संबंधित समस्याही दूर होऊ शकतात. (Photo Credit : pexels )
आवळा खाणे इतके सोपे नसले तरी चवीला तुरट असल्याने चटणी, मुरब्बा या स्वरूपात आपण त्याचा आपल्या आहारात समावेश करू शकता. (Photo Credit : pexels )
तसं तर आवळा खाण्याचा आणखी एक मार्ग आहे, जो चवीलाही जबरदस्त आहे आणि आरोग्यासाठीही जबरदस्त आहे. हा आंबवलेला आवळा आहे. आंबवलेल्या आवळ्यामध्ये पोषक घटक असतात. (Photo Credit : pexels )
आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे आतड्यांचे योग्य कार्य राखण्याचे आणि निरोगी ठेवण्याचे काम करते. आंबवल्याने आवळ्यातील फायबर तसेच प्रोबायोटिक गुणधर्मही वाढतात, ज्यामुळे आतड्यांमधील निरोगी जीवाणू वाढतात. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. बद्धकोष्ठता, गॅस, सारख्या समस्याचा त्रास होत नाही. (Photo Credit : pexels )
आवळ्यामध्ये जीवनसत्त्व सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करतात. विशेषतः हिवाळ्यात आंबवलेले आवळा खावे. (Photo Credit : pexels )
हृदयाशी संबंधित आजारांचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा होणे. आवळा खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये साठलेली चरबी कमी होते. शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते, ज्यामुळे हृदयच नव्हे तर अनेक आजारांचा धोका टळतो . (Photo Credit : pexels )
आवळा फॅट बर्निंग तसेच शरीरात गोठलेल्या कोलेस्टेरॉलमध्ये खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने चयापचय योग्य राहते, ज्यामुळे लठ्ठपणा झपाट्याने कमी होतो. यासोबतच शरीरात असलेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठीही आवळा प्रभावी ठरतो. (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )