Vitamin-C : जीवनसत्त्व - सी ची कमतरता होऊ शकते तुमच्या सौंदर्यावर ग्रहण, आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास सौंदर्य परत येईल !
आपले आरोग्य राखण्यासाठी जीवनसत्त्व -सी खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याच्या कमतरतेमुळे त्वचेपासून हिरड्यांना त्रास होऊ शकतो.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजीवनसत्त्व -सीच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला स्कर्वी म्हणतात. यामुळे हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे, त्वचेच्या आत रक्तस्त्राव होणे आणि दात कमकुवत होणे यासारखी लक्षणे उद्भवू शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी जीवनसत्त्व -सी भरपूर असणं अत्यंत गरजेचं आहे.(Photo Credit : pexels )
जीवनसत्त्व सी हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे. या कारणास्तव, शरीर ते साठवण्यास सक्षम नाही. त्यामुळे त्याची कमतरता आपल्या आहारातून नियमितपणे भरून काढणे अत्यंत गरजेचे आहे. काही खाद्यपदार्थ असे असतात ज्यात जीवनसत्त्व -सी खूप जास्त प्रमाणात आढळते. चला तर मग जाणून घेऊया, जीवनसत्त्व -सीची कमतरता दूर करण्यासाठी आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.(Photo Credit : pexels )
जीवनसत्त्व सी एक प्रमुख अँटीऑक्सिडेंट आहे, जो खराब रॅडिकल्सशी लढून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे कार्य करतो. हे त्वचेचे रक्षण करते, हाडे आणि दात मजबूत ठेवते आणि संसर्गाचा धोका देखील कमी करते.(Photo Credit : pexels )
एक कप चिरलेल्या ब्रोकोलीमध्ये 81.2 मिलीग्राम जीवनसत्त्व सी असते, जे हाडे मजबूत ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील राखते.(Photo Credit : pexels )
एका मोठ्या लिंबामध्ये सुमारे 60 मिलीग्राम जीवनसत्त्व -सी असते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि ताजेपणा आणि ऊर्जा वाढते.(Photo Credit : pexels )
एक कप चिरलेली पपई सुमारे 88 मिलीग्राम जीवनसत्त्व -सी प्रदान करते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )
एक कप चिरलेल्या अननसामध्ये 78.9 मिलीग्राम जीवनसत्व -सी असते, जे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )