Hair Care : स्वयंपाकघरातील या गोष्टींच्या वापर करा, केस गळण्याची समस्या होईल दूर!
केसगळती रोखण्यासाठी, महागड्या शॅम्पू किंवा तेलाऐवजी आपल्या स्वयंपाकघरात असलेले काही घटक वापरा, हे केस गळती रोखण्यासाठी प्रभावी मानले जातात . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकढीपत्ता : केसांच्या वाढीसाठी तुम्ही कढीपत्ता देखील वापरू शकता. कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे केसांची लांबी वाढवण्यास मदत करतात . ज्या लोकांचे केस खूप पातळ आहेत किंवा जास्त केस गळत आहेत त्यांनी त्यांच्या केसांवर हा उपाय करा . [Photo Credit :graceofgods.com ]
यासाठी लोक अनेक महागडी उत्पादने वापरतात. मात्र त्यानंतरही त्यांना या समस्येतून दिलासा मिळत नाही. तसेच या उत्पादनांमध्ये केमिकल्स असल्याने केसांच्या समस्या आणखी वाढतात . [Photo Credit : Pexel.com]
अशा परिस्थितीत केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टींच्या वापराने केस गळण्याची समस्या कमी होईल . [Photo Credit : Pexel.com]
यासाठी 12 ते 15 कढीपत्ता घ्या आणि एका भांड्यात खोबरेल तेलात उकळा. कढीपत्ता चांगला उकळला की गॅसवरून तेल काढून थंड करायला ठेवा . [Photo Credit : Pexel.com]
ते थंड झाल्यावर या मिश्रणाने केसांच्या मुळांना मसाज करा . आता हे तेल केसांवर काही तास राहू द्या, नंतर सौम्य शाम्पू आणि पाण्याने केस धुवा . [Photo Credit : Pexel.com]
कांद्याचा रस : कांद्याचा रस देखील तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे . यामुळेच आता अनेक केसांच्या उत्पादनांमध्ये कांद्याचा रस मिसळला जातो . [Photo Credit : Pexel.com]
कांद्याचा रस लावल्याने केसांची लांबी झपाट्याने वाढते . यासाठी केसांना ताज्या कांद्याचा रस लावा. 40 ते 50 मिनिटे केसांवर राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा . [Photo Credit : Pexel.com]
मेथी दाणे : केस गळत असल्यास मेथीचाही वापर करू शकता . मेथीमध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने आढळतात ज्यामुळे केस निरोगी राहतेच पण ते लांब होण्यासही मदत होते . [Photo Credit : linkedin ]
याशिवाय मेथीच्या दाण्यांमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस आतून मजबूत होतात . तसेच कोंडा दूर करतो . [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]