Laptops : नेहमी लॅपटॉप वापरता होऊ शकते डोळ्यासंबंधी ही समस्या!
काम करणारे आणि विद्यार्थी आपला जास्तीत जास्त वेळ लॅपटॉपसोबत घालवतात. सतत लॅपटॉपकडे पाहिल्याने डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.[Photo Credit:Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळे डोळ्यांवर खूप ताण येतो किंवा दाब येतो, जो आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही.[Photo Credit:Pexel.com]
अशा परिस्थितीत, जे लोक घरातून काम करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी लॅपटॉप वापरतात त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.[Photo Credit:Pexel.com]
लॅपटॉपचा डोळ्यांवर असा होतो परिणाम : लॅपटॉप जास्त वेळ वापरल्याने आणि तासनतास स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांवर ताण येतो किंवा डोळे कोरडे होतात.[Photo Credit:Pexel.com]
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लॅपटॉपच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक असतो.[Photo Credit:Pexel.com]
कोरडे डोळे केवळ आपल्या आरोग्यावरच परिणाम करत नाहीत तर आपल्या दैनंदिन कामाच्या उत्पादकतेवरही परिणाम करतात.[Photo Credit:Pexel.com]
ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय: ड्राय आय सिंड्रोममध्ये एकतर डोळ्यांत कमी अश्रू येऊ लागतात किंवा त्यांची गुणवत्ता चांगली नसते.डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवणे, खाज सुटणे आणि जळजळ होणे, सतत त्यांना चोळत राहावे लागणे अशी त्याची लक्षणे आहेत.[Photo Credit:Pexel.com]
याशिवाय डोळ्यांत काहीतरी पडल्यासारखे वाटणे, विनाकारण डोळ्यांतून पाणी येणे, थकवा येणे किंवा डोळ्यांत सूज येणे आणि ते आकुंचन पावणे व लहान होणे हीदेखील डोळ्यांच्या कोरड्या होण्याची लक्षणे आहेत.[Photo Credit:Pexel.com]
वाढते प्रदूषण, संगणक-लॅपटॉपचा वापर, एसी. ड्राय आय सिंड्रोमची मुख्य कारणे व्यसन, वेदनाशामक औषधे, तणाव, उच्च रक्तदाब इत्यादी आहेत.[Photo Credit:Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit:Pexel.com]