Healthnews : वर्कआउट करताना पाणी पिणे ठरते घातक?
आज जाणून घेऊया वर्कआउट करताना जास्त पाणी पिण्याचे धोके काय आहेत आणि तुम्ही किती पाणी प्यावे याची योग्य काळजी कशी घ्यावी. [Photo Credit:Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआम्ही तुम्हाला काही सोप्या आणि फायदेशीर टिप्स देखील सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकाल. [Photo Credit:Pexel.com]
हायपोनेट्रेमियाचा धोका: जर आपण व्यायामादरम्यान आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायलो तर आपल्या रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते. याला हायपोनेट्रेमिया म्हणतात.जे खूप धोकादायक असू शकते. [Photo Credit:Pexel.com]
पाणी प्यायल्या नंतर डोकेदुखी, गोंधळ,थकवा किंवा मळमळ जाणवत असल्यास, ही हायपोनेट्रेमियाची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत ताबडतोब पाणी पिणे थांबवा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा. [Photo Credit:Pexel.com]
योग्य प्रमाणात पाणी प्या: प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असतात. साधारणपणे, वर्कआउट करताना दर 20 मिनिटांनी सुमारे 240 मिली पाणी प्यावे.[Photo Credit:Pexel.com]
परंतु हे प्रमाण तुमची शारीरिक हालचाल, हवामान आणि घामाचे प्रमाण यावर अवलंबून असते. पिण्याच्या पाण्यासोबत, तुमच्या व्यायामापूर्वी आणि नंतर इलेक्ट्रोलाइट्स युक्त पेये घ्या.या पेयांमध्ये सोडियम आणि पोटॅशियम भरपूर असते ज्यामुळे हायपोनेट्रेमियाचा धोका कमी होतो. [Photo Credit:Pexel.com]
व्यायामापूर्वी पाणी प्या : व्यायामापूर्वी आणि व्यायामादरम्यान पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. [Photo Credit:Pexel.com]
जर तुम्ही व्यायामापूर्वी भरपूर पाणी प्यायले तर ते तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवते आणि तुमची ऊर्जा टिकवून ठेवते. यामुळे तुम्ही जास्त वेळ आणि चांगला व्यायाम करू शकता.[Photo Credit:Pexel.com]
जरी व्यायाम करताना पाणी प्यावे वाटलेच तर प्रत्येक20 मिनिटांत थोडे पाणी प्यावे जेणेकरुन तुम्हाला थकवा जाणवू नये.[Photo Credit:Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit:Pexel.com]