Symptoms of Heart Attack :सावधान! 'ही' लक्षणे दिसत आहेत? तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो!
हृदयविकाराचा झटका हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये हृदयाच्या धमन्या अचानक ब्लॉक होतात. पूर्वी ही समस्या 40-50 वर्षांनंतरच दिसून येत होती, परंतु आजकाल 30 वर्षांखालील अनेक तरुण याला बळी पडत आहेत. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामागे वाईट जीवनशैली, धकाधकीचे जीवन आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी अशी अनेक कारणे आहेत. पण कधी कधी आपल्या शरीरात काही बदल होतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण हे बदल हर्ट अटॅक सारख्या जीवघेण्या आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
छाती दुखणे : हृदयविकाराच्या झटक्याने छातीत होणारी वेदना खूप तीव्र आणि सतत असते. हे दुखणे सहसा छातीच्या आतील भागात होते, श्वास घेतानाही दुखत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण आहे असे समजावे , अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा अन्यथा ते जीवघेणे ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]
जास्त घाम येणे : जर तुम्हाला बसताना, झोपताना किंवा अगदी कमी उष्णतेमध्ये अचानक भरपूर घाम येऊ लागला तर त्याला हलके घेऊ नका. अनेक वेळा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जास्त घाम येणे हे त्याचे लक्षण असते. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. [Photo Credit : Pexel.com]
डाव्या बाजूला त्रास : हृदयविकाराच्या सुरुवातीला शरीराच्या डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवणे हे एक सामान्य लक्षण आहे. जर तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये, खांद्यामध्ये किंवा जबड्यात कोणत्याही कारणाशिवाय अशक्तपणा किंवा वेदना जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. [Photo Credit : Pexel.com]
अनेक वेळा आपल्या शरीरात काही बदल होतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु काहीवेळा हे बदल हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात.त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. [Photo Credit : Pexel.com]
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : freeimage.com]