Expensive Dogs : पिटबुलपासून मॅस्टिफपर्यंत 'या' आहेत भारतात आढळणाऱ्या कुत्र्यांच्या सर्वात महागड्या जाती

Expensive Dogs : अनेकांना कुत्रे पाळणे आवडते, यासाठी ते भक्कम रक्कम देखील मोजायला तयार असतात. भारतात देखील अनेक महागडे कुत्रे विकले जातात.

Expensive Dogs In India

1/9
सर्व प्राण्यांमध्ये कुत्रा हा असा प्राणी आहे जो मानवाच्या हृदयाच्या सर्वात जवळ पोहोचू शकतो. आपल्या जीवनात त्यांचे अस्तित्व काय आहे, हे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. यामुळेच अनेकजण त्यांना आपल्या आयुष्यात कुटुंबातील सदस्याचे स्थान देतात.
2/9
कुत्रे कुठल्याही जातीचे असले तरी जीवनात आनंद आणतात असे अनेकांची भावना आहे. अनेकजण आपल्या आवडीच्या कुत्र्यासाठी कितीही पैसे खर्च करायला तयार असतात.
3/9
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, भारतातील सर्वात महागड्या कुत्र्यांची कोणती जात आहे? तर, भारतात अशा काही कुत्र्यांच्या जाती आहेत ज्या देशातील सर्वात महागड्या जाती म्हणून ओळखल्या जातात.
4/9
रेड नोज पिटबुल टेरियर ही भारतात आढळणारी कुत्र्यांची सर्वात महागडी जात आहे. ही जात इंग्लंड आणि आयरलैड वरून येते, जी मध्यम आकाराची, परंतु अत्यंत शक्तिशाली आहे. त्यांना पकडणे, उंच उडी मारणे इत्यादी प्रशिक्षण व शिकवता येते.
5/9
भारतात रेड नोज पिटबुल टेरियर या जातीची किंमत 75 हजार रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत आहे. या जातीचे वजन 16 ते 30 किलोपर्यंत असू शकते. आणि लांबी सुमारे 50 सेंटीमीटर असते .
6/9
इंग्लिश मैस्टिफ ही जातही इंग्लंडचीच आहे. इंग्लिश मॅस्टिफ दिसायला चांगले असतात, त्यांचे डोके मोठे असते आणि कोट सोनेरी ते गडद तपकिरी किंवा सिल्व्हर फाऊनपर्यंत असतो. भारतात या जातीची किंमत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे. या जातीचे वजन 72.6 ते 104.3 किलोपर्यंत असू शकते.
7/9
सोबतच तिबेटी मास्टिफ ही तिबेटची एक जात आहे, जी तिबेटव्यतिरिक्त नेपाळ आणि उत्तर भारतात बरीच लोकप्रिय आहे. हिमालयातील मोठ्या कुत्र्याचा स्वभाव इतर कुत्र्यांपेक्षा बराच वेगळा असतो. घरी येणारे पाहुणे किंवा अनोळखी व्यक्तींना भेटण्यात त्यांना रस नसतो, त्यांना स्वत:मध्येच राहायला आवडते.
8/9
अलास्का मालाम्यूट्स कुत्र्यांच्या सर्वात प्राचीन जातींपैकी एक आहेत. ते मोठ्या आकारासह बर्यापैकी शक्तिशाली आहेत, जे अलास्कामध्ये स्लेज खेचण्याचे आणि माल लोड करण्याचे कामही करतात. या जाती अपार्टमेंट किंवा उबदार तापमानासाठी बनलेल्या नसतात. त्यांना घराबाहेर आणि मोकळ्या बसायला आवडतं. भारतात या जातीची किंमत 2 लाख रुपयांपासून सुमारे 4 लाख रुपयांपर्यंत आहे. जातीचे वजन 32 ते 43 किलोपर्यंत असू शकते.लांबी सुमारे 61 ते 66 सेंटीमीटर असते.
9/9
अकीता इनू जपानची ही जात इतर कुत्र्यांपेक्षा काहीशी वेगळी दिसते. त्यांचे डोळे लहान व बदामाच्या आकाराचे असतात. अकिता इनू आकाराने खूप मोठी आहे, पण दिसायला खूप सुंदर आहे. भारतात या जातीची किंमत 1 लाख 50 हजार रुपयांपासून सुमारे 40 लाख रुपयांपर्यंत आहे. जातीचे वजन 45 किलोपर्यंत असू शकते. लांबी सुमारे 61 ते 66 सेंटीमीटर असते.
Sponsored Links by Taboola