Water After Eating : जेवल्यानंतर लगेच पाणी प्यावे का ? जाणून घ्या ...
डॉक्टर सांगतात की जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ॲसिडिटी आणि ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. असे केल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. [Photo Credit.Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे जेवल्यानंतर पाणी प्यावे का ? चला जाणून घेऊया जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत आणि किती वेळानंतर पाणी प्यावे… [Photo Credit.Pexel.com]
जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत?जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने लठ्ठपणा वाढू शकतो तसेच पचनाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते . [Photo Credit.Pexel.com]
पोटात गॅस सारख्या समस्या वाढू शकतात आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. [Photo Credit.Pexel.com]
जेवणानंतर पाणी कधी प्यावे? : जेव्हाही अन्न शरीरात जाते तेव्हा ते पचायला किमान दोन तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्यास त्याचा पचनावर परिणाम होतो. [Photo Credit.Pexel.com]
त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर किमान 45 ते 60 मिनिटे पाणी प्यावे. जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायचे असेल तर अर्धा तास आधी प्यावे. [Photo Credit.Pexel.com]
जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे :जेवणानंतर एक तासाने पाणी प्यायल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास कधीच होणार नाही. [Photo Credit.Pexel.com]
जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी प्यायल्यास पोटात गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या होत नाहीत. खाल्ल्यानंतर शरीरात पाणी उशिरा पोहोचले की, शरीर अन्नातील पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास सक्षम होते. [Photo Credit.Pexel.com]
जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पचनसंस्था मजबूत होते. जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायल्याने झोप सुधारते आणि अनेक समस्या दूर होतात. [Photo Credit.Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit.Pexel.com]