Health Tips : मासिक पाळी दरम्यान गोळ्या घेत आहात? तर आधी 'हे' वाचा...
मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना आपल्या जीवनशैलीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतात. इतकंच नाही तर ताणतणावातही लक्षणीय वाढ होऊ शकते. मासिक पाळी दरम्यान वेदना सौम्य आणि गंभीर दोन्ही असू शकतात. मासिक पाळी दरम्यान खूप वेदना आणि पोटदुखी सहन करावी लागते.अशा वेदना सहन करणे कठीण जाते अशा वेळी अनेकजणी पेन किलर घेतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमासिक पाळीच्या काळात पेनकिलर आपल्या शरीरासाठी हानिकारक की चांगल्या असतात या संदर्भात जाणून घ्या. [Photo Credit : Pexel.com]
मासिक पाळी दरम्यान घेतलेली बहुतेक पेनकिलर गर्भाशयाच्या स्नायूंना आराम देण्याचे काम करतात, ज्यामुळे वेदना कमी होते. परंतु जर तुम्ही तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येक वेळी पेनकिलर घेत असाल तर ते प्रोस्टॅग्लॅंडिन कमी करून तुमची वेदना कमी करते.हे हानिकारक ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळी दरम्यान जास्त औषध घेणे आवश्यक नाही. जर वेदना असह्य होत असेल तर 8 तासांच्या अंतराने एक किंवा 2 दिवस पेनकिलर घ्या. ते जास्त प्रमाणात घेतल्यास डोकेदुखी, पोटदुखी किंवा किडनी खराब होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]
मासिक पाळी दरम्यान आरोग्य तज्ञ किंवा स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय औषधे घेणे सुरू करू नका. [Photo Credit : Pexel.com]
मासिक पाळी दरम्यान वेदना आणि पोट दुखणे काही वेळानंतर अधिक समस्या निर्माण करू शकतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात पेनकिलर घेतल्यास तुम्हाला भविष्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
ऍसिड रिफ्लक्स आणि गॅस्ट्र्रिटिसमुळे पोटदुखी हे पेनकिलर घेण्याचे दुष्परिणाम आहेत.काही प्रकरणांमध्ये यामुळे पोटात अल्सर देखील होऊ शकतो.त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या,औषधे घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]