Christmas 2023 : भारतातील 'या' ठिकाणी ख्रिसमस सेलिब्रेशन खूप खास असते; तुम्हीही सहभागी होऊ शकता
डिसेंबर असा महिना आहे की, ख्रिसमसपासून ते नवीन वर्षापर्यंत सुट्ट्या असतात. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना एक दिवस सुटी मिळणे कठीण आहे, तर यावेळी तुम्हाला 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसला तीन दिवसांची सुट्टी मिळतेय. (Photo credit : Pexelsy)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appख्रिसमस आणि नवीन वर्ष हा कालावधी प्रवाश्यांसाठी तसेच हवशी लोकांसाठी खूप चांगला आहे. जाणून घ्या ख्रिसनास कुठे कुठे खास पद्धतीने साजरा केला जातो. (Photo credit : Pexelsy)
गोवा : गोव्यात नेहमीच काही ना काही उत्सव होत असतात. पण डिसेंबरमध्ये आणखी सण आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पर्यटक लांब लांबून येथे येतात आणि नवीन वर्ष साजरी करून ते येथून आपापल्या घरी जातात. (Photo credit : Pexelsy)
गोव्यात नाईट लाईफची मजाच वेगळी आहे पण, इथे ख्रिसमसही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या काळात केवळ चर्चच नाही तर रस्त्यांवर आणि इमारतींवरही रंगीबेरंगी दिवे लावले जातात.(Photo credit : Pexelsy)
पाँडिचेरी : पाँडिचेरीला भारताचा छोटा फ्रान्स असेही म्हटले जाते. फ्रेंच लोकांनी येथे दीर्घकाळ राज्य केलंय. येथे मोठ्या संख्येने ख्रिश्चन लोक राहतात, त्यामुळे ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुम्ही ख्रिसमस लाँग वीकेंडमध्ये येथे येण्याची योजना करू शकता. येथे भेट देण्यासाठी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत.(Photo credit : Pexelsy)
सिक्किम : ईशान्य सिक्कीममध्ये येऊन तुम्ही ख्रिसमसचा आनंद घेऊ शकता. डिसेंबर महिन्यात सिक्कीममध्ये खूप थंडी असते, इथे ख्रिसमसचा सण खूप छान साजरा केला जातो.(Photo credit : Pexelsy)
केरळ : केरळ हे भारतीयांचे सर्वात आवडते शहर आहे. लोक इथे सतत भेट देत असतात. तुम्हीही खूप दिवसांपासून इथे येण्याचा विचार करत असाल, तर ख्रिसमस ही उत्तम संधी आहे. (Photo credit : Pexelsy)
केरळ मध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात. त्यामुळे येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक चर्चमध्ये तुम्हाला या उत्सवाची भव्यता पाहायला मिळेल.(Photo credit : Pexelsy)
तुम्ही देखील ख्रिसमसच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा विचार करत असला तर ही ठिकाणे खूप खास आहेत ख्रिसमस पार्टी साजरी करण्यासाठी. (Photo credit : Pexelsy)
तुम्हला ख्रिसमस पार्टीचा आनंद लुटायचा असेल आणि तुमच्या सुट्ट्या आनंदात घालवायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकतात. (Photo credit : Pexelsy)