Mental Health : तुम्हाला ही लक्षणे दिसत आहेत? मानसिक आरोग्य तपासा!
शारीरिक आरोग्यासोबतच मानसिकदृष्ट्याही निरोगी राहणे खूप गरजेचे आहे. कारण तुमचे मानसिक आरोग्य चांगले नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावरही होतो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजच्या धावपळीच्या जगात, चांगली कामगिरी करण्याचा दबाव, यशस्वी होण्याचे दडपण, काहीतरी करण्याचे दडपण, कुटुंबाशी संबंधित दबाव किंवा नात्यात सुरू असलेल्या वितुष्टामुळे दबाव असे अनेक प्रकारचे दबाव आपल्यावर असतात. [Photo Credit : Pexel.com]
जीवनात येणाऱ्या समस्या आपल्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवतात. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य किती चांगले किंवा वाईट आहे आणि आपण डॉक्टरांची मदत कधी घ्यावी हे आपणास माहित असले पाहिजे. [Photo Credit : Pexel.com]
खराब मानसिक आरोग्य कसे ओळखायचे ?नेहमी थकल्यासारखे वाटणे: जर तुम्ही नेहमी थकल्यासारखे असाल आणि एखाद्या गोष्टीबद्दल काळजीत असाल, तर हे लक्षण असू शकते की तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी विश्रांती घेण्याची गरज आहे. थकव्यामुळे बर्नआउट होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करणे आणि चांगली कामगिरी करणे कठीण होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]
चिडचिड आणि मूडी असणे: जर तुम्हाला तुमच्या मनःस्थितीत वारंवार बदल होत असतील किंवा तुम्हाला वारंवार चिडचिड होत असेल, तर तुमचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे आणि तुम्ही गंभीर तणावाखाली आहात हे लक्षण आहे. [Photo Credit : Pexel.com]
जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब मानसिक आरोग्य ब्रेक घ्या. कारण जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे मानसिक आरोग्य सतत बिघडू शकते, ज्याचा परिणाम तुमच्या कामावर तर होईलच पण तुमच्या नातेसंबंधांवरही परिणाम होईल आणि त्यामुळे आणखी वाद आणि गैरसमज निर्माण होतील. [Photo Credit : Pexel.com]
आजारी वाटणे: जेव्हा आपले मानसिक आरोग्य चांगले नसते तेव्हा आपले शरीर देखील आजारी वाटू लागते. डोकेदुखी, स्नायूंचा ताण आणि पचनाच्या समस्या दिसू लागतात. जर तुम्हाला ही लक्षणे विनाकारण जाणवत असतील तर तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी ब्रेक घेण्याची गरज आहे हे समजून घ्या. [Photo Credit : Pexel.com]
झोपेत अडचण: जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल काळजीत असते किंवा जास्त ताण घेते तेव्हा झोप अनेकदा कुठेतरी गायब होते. जर तुम्ही दिवसभर थकलेले असाल आणि तरीही झोपायला त्रास होत असेल, तर तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी ब्रेक घेण्याची आवश्यकता आहे. [Photo Credit : Pexel.com]
तुमचं आवडतं कामही करण्याचा कंटाळा येतो : एखादी व्यक्ती आपल्या आवडत्या कामाकडे तेव्हाच दुर्लक्ष करते जेव्हा त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले असते किंवा त्याला एखाद्या गोष्टीचा ताण असतो.अशा वेळी ब्रेक घ्या. [Photo Credit : Pexel.com]
वारंवार चुका करणे: वारंवार चुका करणे हे देखील चांगल्या मानसिक आरोग्याचे लक्षण नाही. जर तुम्हाला स्वतःमध्ये ही चिन्हे दिसत असतील तर लगेच मानसिक आरोग्यासाठी ब्रेक घ्या. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]