Nashik Yeola Patangotsav 2024 : ढील दे, ढील दे दे रे भैया...! येवल्यात 'एबीपी माझा'च्या पतंगाची जोरदार चर्चा
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पतंग (Kite) उडविण्याची परंपरा येवल्याच्या नागरिकांनी जपली आहे. रविवारपासून येवला शहरात पतंगोत्सवाला सुरुवात झाली आहे. सलग तीन दिवस येवला शहरातील आकाशात लाखो पतंग झेपावणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिरभ्र आकाशात वेगवेगळ्या पतंग उंचच उंच भरारी घेताना 'एबीपी माझा'चा (ABP Majha) पतंग देखील आकाशात उंच उडणार आहे.
येवल्यातील भावसार पतंग स्टॉलवर 'एबीपी माझा'चा पतंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
राजकीय नेते , राम मंदिर, विविध संदेश देणारे पतंग यासोबतच एबीपी माझाच्या पतंगाची सध्या येवल्यात जोरदार चर्चा होत आहे.
राजकारणात ज्यांच्या पतंग समोर येतील त्यांच्या पतंग कापणार येवल्यातील सर्वच पतंग सोबत घेवून उंच उडवायच्या आहेत. माझीही पतंग उंच उडवायची आहे.
मात्र राजकारणात ज्यांच्या पतंग समोर येतील त्यांच्या पतंग मात्र कापणार आहे. यापूर्वी देखील राजकारणात काही पतंग कापल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात दिली.
'एबीपी माझा'चा पतंग हाती घेत भुजबळांकडून येवलेकरांना शुभेच्छा मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात पतंग महोत्सवात सहभाग घेतला. तसेच त्यांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी 'एबीपी माझा' चा पतंग हाती घेत येवलेकरांना मकर संक्रातीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
राज्याच्या विविध भागांतून नागरिक येवल्यात दाखल तीन दिवस चालणारा हा पतंगोत्सव बघण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे नातेवाइक, मित्रमंडळी तसेच देशाच्या राज्याच्या विविध भागातून नागरिक, पाहुणे येवला शहरात दाखल झाले आहेत.
शहरातील यवक, महिला, युवती, लहान मुले, तसेच वृद्ध मंडळीदेखील पतंग उडविण्याचा आनंद लुटताना दिसून येतात. येवल्याचा मकरसंक्रांतीला सलग तीन दिवस पतंग उडविण्याचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक लागतो तर भारतात दुसरा क्रमांक लागतो.
फटाक्यांचीही आतिषबाजी मकरसंक्रांतीनिमित्ताने पतंग उडविण्याचा आनंद घेत असतानाच रात्रीच्या वेळी येवला शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात येते.
विविध प्रकारचे आकाशदिवे आकाशात सोडण्यात येतात तर विविध आकर्षण फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात येते.
दीपावली सणापेक्षा अधिक प्रमाणात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी शहरातील नागरिकांकडून मकरसंक्रांतीला करण्यात येते.