Using Mobile while Eating : जेवताना मोबाईल वापरता? आधी हे वाचा!
आज मोबाईलने आपल्या आयुष्यात एवढी ढवळाढवळ करायला सुरुवात केली आहे की जेवताना, उठता-बसता आपले लक्ष मोबाईलकडेच असते. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appन्याहारी असो, दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण असो, या काळातही अनेकांना मोबाईल वापरण्याची सवय असते. यामुळे ते तासन् तास अन्न खात राहतात. [Photo Credit : Pexel.com]
तुम्हीही असेच करत असाल तर सावध व्हा, कारण ते आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. असे करणे म्हणजे स्वतःच आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. [Photo Credit : Pexel.com]
ही सवय मुलांमध्येही दिसून येते. पालक त्यांच्या आग्रहापुढे नतमस्तक होतात पण कदाचित त्यांना हे माहीत नसतं की असं करणं आपल्या मुलासाठी अजिबात योग्य नाही. जेवताना स्मार्टफोन वापरल्याने आजारांचा धोका वाढतो. [Photo Credit : Pexel.com]
जेवताना फोन वापरल्याने या आजारांचा धोका ?मधुमेह: जे लोक जेवताना मोबाईल फोन वापरतात किंवा टीव्ही पाहतात त्यांना मधुमेहाचा धोका असू शकतो. [Photo Credit : Pexel.com]
जेवताना मोबाईल वापरल्याने अन्नावर योग्य प्रक्रिया होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे वजन वाढू लागते. अशा स्थितीत चयापचय मंद झाल्यामुळे मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. [Photo Credit : Pexel.com]
लठ्ठपणा: जेवताना तुम्ही तुमचा मोबाईल वापरता तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष मोबाईलवरच असते. यामुळे तुमची भूक कमी होईल किंवा खूप अन्न खाण्यात येते . [Photo Credit : Pexel.com]
अशा परिस्थितीत जास्त खाल्ल्याने लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. लठ्ठपणा वाढल्यामुळे शरीरावर अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे जेवताना चुकूनही फोन वापरू नका. [Photo Credit : Pexel.com]
अन्न पचन:जेवताना सर्व लक्ष मोबाईल जवळ असल्यावर जेवणाकडे कमी आणि मोबाईलवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते.यामुळे अन्न नीट चघळले जात नाही आणि ते थेट गिळले जाते. [Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे अन्न पचत नाही आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात. होऊ शकते. त्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]