Health Tips : जाणून घ्या फळे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ,नाही तर तुम्ही आजारांना बळी पडू शकता !
आयुर्वेदात खाण्याची एक पद्धत आहे, ज्याचे अनुसरण करून तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पूर्वीच्या काळी लोकांच्या आरोग्यामागचे हे एक मोठे कारण होते की त्यांचे नियम झोपण्या-उठण्यापासून खाण्या-पिण्यापर्यंत ठरलेले असत.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलत्या काळानुसार या सवयी बदलल्या आणि आज आपण ज्या प्रकारचे जीवन जगत आहोत ते लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या सामान्य आजारांचे सर्वात मोठे कारण आहे. (Photo Credit : pexels )
निरोगी राहण्यासाठी भाज्या आणि फळांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे, परंतु त्याचा जास्तीत जास्त फायदा शरीराला मिळण्यासाठी त्यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाण्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल.(Photo Credit : pexels )
आयुर्वेदानुसार संध्याकाळी किंवा रात्री फळे खाल्ल्याने कफची समस्या उद्भवू शकते. याशिवाय अनेकदा ते नीट पचत नाही, त्यामुळे त्याचे पोषण शरीराला नीट मिळत नाही. (Photo Credit : pexels )
फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळे खाणे जास्त फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार फळे चघळल्याने त्यात असलेले फायबर थेट शरीरात पोहोचते. (Photo Credit : pexels )
जेवणासोबत फळे खाण्याची चूक करू नका. हा अजिबात योग्य मार्ग नाही. यामुळे फायदा होण्याऐवजी शरीराचे नुकसान होऊ शकते. शरीरात सूज येण्याबरोबर अपचनाची समस्या उद्भवू शकते.(Photo Credit : pexels )
दूध किंवा दही मिसळलेली फळे खाऊ नयेत.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )