Lifestyle : तुम्ही ब्रश करण्याआधी पाणी पिता ? हे जाणून घ्या!
दिवसातून किमान 10-12 ग्लास पाणी प्यायला हवे,असे डॉक्टरांचे म्हणणे आहे, पण ब्रश न करता पाणी पिणे आवश्यक आहे की त्यात काही नुकसान आहे? याचे उत्तर जाणून घेऊया...[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसकाळी दात न घासता पाणी प्यावे की नाही :सकाळी लवकर पाणी प्यायल्याने आरोग्य चांगले राहते. यामुळे तुमचे शरीर दिवसभर हायड्रेट राहते. असे केल्याने पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत.तुमची त्वचा नेहमी तजेलदार राहते.[Photo Credit : Pexel.com]
दात न घासता पाणी पिणे फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.यामुळे पचनशक्ती मजबूत होते.याशिवाय तुम्ही दिवसभरात जे काही खातो किंवा पितो ते सहज पचते. [Photo Credit : Pexel.com]
जर तुम्ही सकाळी उठून रिकाम्या पोटी दात न घासता पाणी प्यायले तर तुमची प्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते.सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर अनेक आजारांना तुम्ही सहजासहजी बळी पडत नाही. [Photo Credit : Pexel.com]
लांब, दाट केस आणि चमकदार त्वचेसाठी, सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी पिणे फायदेशीर आहे.यामुळे पोटाची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.[Photo Credit : Pexel.com]
सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होते. हे बद्धकोष्ठता,ढेकर आणि तोंडाच्या फोडांपासून देखील आराम देते. [Photo Credit : Pexel.com]
उच्च रक्तदाब आणि साखरेच्या रुग्णांनी सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी प्यावे.असे केल्याने त्यांचे बीपी नियंत्रणात राहते. या सवयीमुळे लठ्ठपणा येत नाही आणि वजनही टिकून राहते.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]